Top
Home > News > आमीर खान आणि किरण राव यांचा वेगळं होण्याचा निर्णय; चाहत्यांना आश्चर्याचा धक्का

आमीर खान आणि किरण राव यांचा वेगळं होण्याचा निर्णय; चाहत्यांना आश्चर्याचा धक्का

आमीर खान आणि किरण राव यांचा वेगळं होण्याचा निर्णय; चाहत्यांना आश्चर्याचा धक्का
X

बॉलिवूडमध्ये उत्तम अशी जोडी म्हणून नेहमी चर्चेत राहणाऱ्या आमिर खान आणि किरण राव यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाने त्यांच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. गेली पंधरा वर्षे एकमेकाच्या सुख-दुखा:त खंबीरपणे उभे राहून आपलं संसार पुढे नेण्याचा प्रयत्न करत असताना आज घटस्फोटाचा निर्णय घेतला असून, आम्ही दोघं विभक्त होत असलो तरी एक पालक आणि परिवार म्हणून आम्ही एकत्रित राहू असं या दोघांनी म्हटलंय.

"गेली 15 वर्षाच्या सुंदर संसारामध्ये आम्हाला सुख, समाधान, आनंदाचे अनेक क्षण अनुभवाला मिळाले. तसेच विश्वास, आदर आणि प्रेम यामुळे आमचे संबंध अधिक सुंदर होत गेले. मात्र, आता एक पती आणि पत्नीची जबाबदारी दूर सारुन आम्ही पालक आणि एक परिवाराच्या माध्यमातून आमच्या आयुष्याची नवीन सुरुवात करतोय. विशेष म्हणजे, हा निर्णय आम्ही आधीच घेतला होता, पण आता त्याची अंमलबजावणी करण्याची योग्य वेळ आली आहे असं आम्हाला वाटतं." असेही आमिर खान आणि किरण राव यांनी म्हटलंय.

किरण राव ह्या आमिर खानच्या दुसरी पत्नी आहे. मात्र अचानक दोघेही असा काही निर्णय घेतील असं कुणलाही वाटलं नव्हत. त्यामुळे त्यांच्या या निर्णयामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Updated : 3 July 2021 7:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top