Home > News > कोविड सेल्फ टेस्ट किट विकत घेत असाल तर हे नक्की वाचा...

कोविड सेल्फ टेस्ट किट विकत घेत असाल तर हे नक्की वाचा...

कोविड सेल्फ टेस्ट किट विकत घेत असाल तर हे नक्की वाचा...
X

कोरोनाच्या सेल्फ टेस्टिंग किटमुळे कोरोना रुग्णांची नेमकी संख्या कळत नाही. हे टाळण्यासाठी सेल्फ टेस्ट किट घेण्यापूर्वी ग्राहकाला आधार कार्ड दाखवणे गरजेचे करण्यात येणार आहे. औषध विक्रीच्या दुकानात आधार कार्डावरील तपशील नोंदवून मगच सेल्फ टेस्ट किट देईल अशी व्यवस्था करण्यात येणार आहे.

सेल्फ टेस्ट किट वापरून कोणी कोरोना पॉझिटीव्ह आले तर त्यांनी संबंधित यंत्रणांना कळवावे तसेच ऑनलाईन पद्धतीनेही माहिती कळवावी अशी सूचनावजा विनंती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली होती.

प्रिस्क्रिप्शनशिवाय किट देऊ नये!

कोरोनाच्या सेल्फ टेस्टिंग किटस्मुळे कोरोना रुग्णांची नेमकी संख्या कळत नाही. त्यामुळे या किटस्चा शेडय़ुल ड्रग्जमध्ये समावेश करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. सेल्फ टेस्ट किटस् हे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्सनशिवाय देऊ नयेत, या दृष्टीने येत्या आठवडाभरात नियमावली तयार करण्याचा विचार सुरू असल्याचे राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले.

सेल्फ टेस्टिंग किटस्च्या सहाय्याने अनेक जण घरीच कोरोना चाचण्या करतात. यामुळे कोरोना रुग्णांची नेमकी संख्या समजत नाही. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हाच मुद्दा बैठकीत उपस्थित करीत केंद्राने यात लक्ष घालण्याची विनंती केली होती. यासंदर्भात राजेंद्र शिंगणे म्हणाले, सध्या कोरोनाच्या सेल्फ टेस्टिंग किटस्वर कोणतेही निर्बंध नाहीत. यासंदर्भात माझी आरोग्यमंत्र्यांशीही चर्चा झाली आहे. या चाचण्यात लोक पॉझिटिव्ह आले तर ते स्वतःच स्वतःचे डॉक्टर होतात. घरी केलेली चाचणी पॉझिटिव्ह आली तर संबंधित यंत्रणेकडे नोंद करून तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. मुळात सेल्फ टेस्टिंग किटमध्ये चाचणी निगेटिव्ह आली का पॉझिटिव्ह आली याचे सखोल ज्ञान तर किती लोकांना प्रत्यक्षात आहे, याबाबत मी साशंक आहे.

आठवडाभरात नियमावली

हल्ली ऊठसूठ कोणीही ऑटिबायोटिक्स व अन्य गोळ्या घेतात. त्यामुळे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय 'शेडय़ुल ड्रग्ज' देऊ नये असे आदेश काढले आहेत. त्याच धर्तीवर कोरोनाच्या सेल्फ टेस्टिंग किटची वर्गवारी कशात बसते हे तज्ञांमार्फत तपासून घ्यावे लागेल. त्याची नियमावली तयार करावी लागेल. कशाला सूट द्यायची व कशाला सूट द्यायची नाही याचे आठवडाभरात निर्णय घेऊ असे ते म्हणाले.

गोळय़ांचे साईड इफेक्टस

सध्या बाजारात आलेल्या कोरोनाच्या नवीन गोळय़ांवरही त्यांनी भाष्य केले. केंद्र सरकारने या गोळय़ा माघारी घेण्याच्या दृष्टीने भूमिका घेतली आहे. या गोळ्यांचा वापर बंद करावा या मताचा मी आहे. महिला खास करून गरोदर महिला व युवकांसाठी या गोळय़ा प्रभावी नाहीत. गोळय़ांचे साईड इफेक्टस खूप आहेत.

Updated : 16 Jan 2022 4:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top