Home > News > युक्रेनमधील बलात्कारांविरोधात Cannesच्या रेड कार्पेटवर महिलेने विवस्त्र होत केलं आंदोलन

युक्रेनमधील बलात्कारांविरोधात Cannesच्या रेड कार्पेटवर महिलेने विवस्त्र होत केलं आंदोलन

युक्रेनमधील बलात्कारांविरोधात Cannesच्या रेड कार्पेटवर महिलेने विवस्त्र होत केलं आंदोलन
X

रशिया (Russia) आणि युक्रेनमधील (Ukraine) युद्धाला आता जवळपास तीन महिने होत आले आहेत, पण अजूनही हे युद्ध थांबण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. पण या युद्धात रशियन सैनिकांनी युक्रेनच्या नागरिकांवर भीषण अत्याचार केल्याचे अनेक आरोप होत आहेत. याचे पडसाद थेट Cannes फिल्म फेस्टिवलमध्ये उमटले आहेत. रशियन सैनिक युक्रेनमधील महिलांवर बलात्कार करत आहेत, ते बलात्कार थांबवा अशा मागणी एका महिलेने Cannes फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर विवस्त्र होत केली आहे.
या महिलेने आपल्या शरीराच्या वरच्या भागावर पेंट केले होते, तिने केवळ कमरेवरचे अंतर्वस्त्र ठेवत उर्वरित शरीरावरील सर्व कपडे काढून फिल्म फेस्टिवल्या रेड कार्पेटवर जोरात घोषणाबाजी सुरू केली. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी पाहुणे येत असताना संध्याकाळी हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. आमच्यावरील बलात्कार थांबवा अशी मागणी या महिलेने केली आहे. हा सगळा प्रकार घडल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी तिला तातडीने ताब्यात घेतले आहे.

काही दिवसांपूर्वीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनीही रशियन सैनिकांनी ताब्यात घेतलेल्या परिसरात महिला आणि लहान मुलांवर लैंगित अत्याचार केले जात असल्याचा आरोप केला होता. आता या आरोपाचे थेट पडसाद कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये उमटले आहेत.

Updated : 21 May 2022 1:29 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top