Home > News > संजय गांधी उद्यानातील 'आनंदचा' कर्करोगाने मृत्यु

संजय गांधी उद्यानातील 'आनंदचा' कर्करोगाने मृत्यु

संजय गांधी उद्यानातील आनंदचा कर्करोगाने मृत्यु
X

बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील व्याघ्र सफारीचे आकर्षण असणाऱ्या ‘आनंद’ या नर वाघाचा मृत्यू झाला आहे. आनंद 10 वर्षाचा होता. आनंदचा मृत्यु कर्करोगाने झाला असून मागील काही दिवसांपासून आनंद'ओठांवरील कर्करोगजन्य गाठीने ग्रस्त होता. त्याला वाचविण्यासाठी पशुवैद्यकांनी अथक प्रयत्न केले मात्र पहाटे त्याच्या मृत्यू झाला.

काही दिवसांपासून याची प्रकृती खालावत चालली होती. या आठवड्यात त्याने अन्न पाणी घेणे बंद केले होते. त्यामुळे आनंदला आयव्ही फ्लूइड्स आणि सप्लिमेन्टस् देण्यात येते होते. मात्र या झुंजीत आनंद पराभूत झाला आणि त्याने जीव सोडला. नॅशनल पार्कच्या व्याघ्र सफारीतला 'आनंद' गेल्यामुळे आता येथे नागपूरहून आणलेल्या सुलतानसह इतर चार वाघिणीच राहिल्या आहेत.

Updated : 9 July 2020 11:49 PM GMT
Next Story
Share it
Top