Home > News > महिलांची वारी आरोग्यवारी व्हावी म्हणून महिला आयोगाचा खास उपक्रम

महिलांची वारी आरोग्यवारी व्हावी म्हणून महिला आयोगाचा खास उपक्रम

महिलांची वारी आरोग्यवारी व्हावी म्हणून महिला आयोगाचा खास उपक्रम
X

पांडुरंगाच्या भेटीसाठी आसूसूलेला वारकरी शेकडो किलोमीटर तहान भूक विसरून चालत असतो , यामध्ये अनेक महिला वारकऱ्यांचा सुद्धा समावेश असतो , आषाढी वारीमध्ये लाखो महिला वारकरी पांडुरंगाच्या भेटीसाठी शेकडो किलोमीटर पायी चालत असतात, ओढ मात्र एकच असते विठुरायाच्या दर्शनाची ,आणि याच महिला वारकऱ्यांची वारी सुरक्षित , आरोग्यदायी होण्यासाठी महिला आयोगातर्फे गेले चार वर्ष आरोग्य वारी हा उपक्रम हाती घेण्यात येत आहे .

आषाढी पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या लाखो महिला वारकऱ्यांच्या आरोग्य , स्वच्छता आणि सुरक्षेच्या दृष्टीने राज्य महिला आयोगाकडून " आरोग्य वारी " या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . अशी माहिती आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी दिली.


वारी काळात दर दहा ते वीस किलोमीटर अंतरावर महिलांसाठी शौचालय व न्हाणीघराची व्यवस्था असावी ,सॅनिटरी नॅपकिन, वेडिंग बर्निंग मशीन ,स्त्री रोग तज्ञांची सुविधा उपलब्ध करून द्यावी . महिलांच्या सुरक्षेकरिता कामाच्या ठिकाणी किंवा मंदिर परिसरात महिला आयोग हेल्पलाईन क्रमांक दर्शनी भागात लावावे , स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष उपलब्ध करून द्यावा अधिक सुरक्षेसाठी निर्भया पथक तैनात करण्यात यावे आधी सूचना आयोगाने प्रशासनाला केल्या आहेत.

महिला वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य हीच पांडुरंगाची सेवा या भावनेने आरोग्य वारीचे नियोजन करण्यात येते.आणि या आरोग्य वारीचे उद्दिष्ट आहे , वारकरी महिलांची सुरक्षा .

Updated : 7 Jun 2025 6:53 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top