Home > News > एकतर्फी प्रेमात आधी महिलेचे कुऱ्हाडीने तुकडे केले, मृत्यूनंतर तासभर मृतदेहाला मिठी मारून बसला

एकतर्फी प्रेमात आधी महिलेचे कुऱ्हाडीने तुकडे केले, मृत्यूनंतर तासभर मृतदेहाला मिठी मारून बसला

एकतर्फी प्रेमात आधी महिलेचे कुऱ्हाडीने तुकडे केले, मृत्यूनंतर तासभर मृतदेहाला मिठी मारून बसला
X

राजस्थानमधील जालोरमध्ये एका प्रियकराने एकतर्फी प्रेमातून महिलेची हत्या केली. महिलेचा मृत्यू होईपर्यंत त्याने कुऱ्हाडीने तिची मान कापली. यानंतर, हा प्रेमी महिलेच्या शरीराला तासन् तास मिठी मारून बसला. पोलिस आल्यानंतरही त्याने मृतदेह सोडला नाही, त्यानंतर पोलिसांनी त्याला जबरदस्तीने मृतदेहापासून वेगळे केले आणि त्या तरुणाला अटक केली आणि महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

ही घटना जालोरमधील अहोर परिसरातील असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातील गणेश थानाराम मीना मनरेगामध्ये काम करणाऱ्या शांतीदेवीवर एकतर्फी प्रेम करत होता. त्याने महिलेचा पाठलाग करून अनेक वेळा त्रास दिला होता. घटनेच्या दिवशी शांतीदेवी मनरेगामध्ये काम करत होत्या. या दरम्यान गणेश आला आणि त्याने आपले प्रेम व्यक्त केले. महिलेने नकार दिल्याने त्याने तिच्यावर कुऱ्हाडीने वार केले. यादरम्यान तो, 'आज तुला मारून टाकीन', असे वारंवार ओरडत होता. महिलेच्या मानेवर, हातावर, खांद्यावर अनेक वार केल्यानंतर महिलेचा मृत्यू झाला तेव्हा गणेश तिच्या शरीराला चिकटला आणि मिठी मारून बसला.

मयत शांतीदेवी हिचा विवाह गावातीलच शांतीलाल चौधरी यांच्याशी झाला होता. कामाच्या निमित्ताने शांतीलाल महाराष्ट्रात राहतात. ही महिला तिच्या सासरच्या घरी राहत होती. असे सांगितले जात आहे की, महिलेने आपल्या पतीला अनेक वेळा गणेशाबद्दल सांगितले होते. शांतीलालने समज दिल्यानंतरही गणेश आयकायला तयार नव्हता आणि महिलेला त्रास देत होता. गणेशला महिलेच्या मृतदेहापासून वेगळे केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. याप्रकरणी महिलेचा मेहुणा गोमाराम याच्यावतीने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

Updated : 25 Oct 2021 5:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top