Home > News > एकतर्फी प्रेमातून कोयत्याने वार करून कबड्डीपट्टू मुलीची हत्या

एकतर्फी प्रेमातून कोयत्याने वार करून कबड्डीपट्टू मुलीची हत्या

एकतर्फी प्रेमातून कोयत्याने वार करून कबड्डीपट्टू मुलीची   हत्या
X

पुणे : पुणे येथे एका कबड्डीपट्टू (kabaddi players) 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेमातून (one-sided love affair) कोयत्याने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना बिबेवाडीमध्ये (bibwewadi) येथे घडली आहे. तीन तरुणांनी या मुलीवर कोयत्याने हल्ला चढवला होता. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी येथील यश लॉन्स इथं ही घटना घडली. क्षितिजा अनंत व्यवहारे (shitija vyavahare) असं हत्या झालेल्या तरुणीचं नाव आहे. क्षितिजा नियमितपणे कब्बडीचा सराव करण्यासाठी संध्याकाळी इथं आली असता, तिथे आलेल्या तीन नराधम तरुणांनी क्षितिजावर कोयत्याने हल्ला चढवला. दरम्यान त्याठिकाणी इतर मुली कबड्डी खेळत होत्या. अचानक झालेल्या या घटनेमुळे तिथे एकच गोंधळ उडाला. आरोपीने क्षितिजा व्यवहारेचा कोयत्याने गळा चिरून हत्या केली. हत्येच्या वेळी त्याच्याकडे पिस्तुल देखील होतं, अशीही माहिती समोर आली. रागाच्या भरात त्याने कोयत्याने सपासप वार केले. घटनेनंतर तिन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. यातील एक आरोप हा क्षितिजाच्या नात्यातला होता, अशी माहितीसमोर आली.एकतर्फी प्रेमातून कबड्डीपटू मुलीचा खून झाल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, मृतदेह ताब्यात घेवून तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. घटनास्थळाचा पंचनामा केला असता आरोपी दोन कोयते, 2 तलवारी, 2 सुरे आणि एक खेळण्यातील पिस्तुल घेऊन आले होते अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. धक्कादायक म्हणजे, घटनास्थळावर पोलिसांची गस्तीवर असलेली गाडी गेली होती. गाडी गेल्यानंतर आरोपी पुन्हा 10 मिनिटात तिथे पोहोचले होते. या प्रकरणी बिबेवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून गुन्हे शाखेसह बिबवेवाडी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

Updated : 13 Oct 2021 2:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top