Home > News > नात्याला काळीमा फासणारी घटना; वडिलांचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

नात्याला काळीमा फासणारी घटना; वडिलांचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

नात्याला  काळीमा फासणारी घटना; वडिलांचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
X

डोंबिवली : आपल्या पोटच्या 9 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वडिलांचा लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना डोंबिवली पश्चिमेत उघली आहे. इतकेच नव्हे हा नराधम स्वतःच्या आठ महिन्याच्या मुलीला दारू जबदरस्तीने दारू पाजयचा. याचा विरोध करणाऱ्या मुलीच्या आईला देखील आरोपी बेदम मारहाण करायचा. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने विष्णूनगर पोलीस ठाण्यात आता तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत नराधम बापाला बेड्या ठोकल्या आहेत. आज आरोपीला कोर्टात हजर केले जाईल असे पोलीस उपनिरीक्षक मोहिनी कपिले यांनी सांगितले.

डोंबिवली मध्ये सदर पीडित 9 वर्षीय अल्पवयीन मुलगी आई वडिलां सोबत राहते. आई कामानिमित्त गावाला गेल्याची संधी साधून आरोपी बापाने तिच्याशी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. इतकेच नव्हे तर तिला शिवीगाळ मारहाण करत धमकी दिली. याबाबत घाबरलेल्या मुलीने आपल्या आईला सर्व घडलेला प्रकार सांगितला.

यानंतरही आरोपी मद्यधुंद अवस्थेत घरी येऊन बायकोशी भांडायचा आणि आठ महिन्याच्या मुलीला दारू पाजत असे, याला विरोध केला म्हणून त्याने आपल्या पत्नीला देखील बेदम मारहाण केली. अखेर या प्रकरणी सदर पिडीतीने विष्णू नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी विकृत बापाला बेड्या ठोकल्यात.तर आज आरोपीला कोर्टात हजर केले जाईल बसे पोलीस उपनिरीक्षक मोहिनी कपिले यांनी सांगितले.


Updated : 30 Oct 2021 10:33 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top