Home > News > लेडीज VS रिकी बहल प्रत्यक्षात, महिलांना सोशल मीडियावर त्रास देणारा हा कोण?

लेडीज VS रिकी बहल प्रत्यक्षात, महिलांना सोशल मीडियावर त्रास देणारा हा कोण?

लेडीज VS रिकी बहल प्रत्यक्षात, महिलांना सोशल मीडियावर त्रास देणारा हा कोण?
X

स्त्रियांना सोशल मिडीयावरून महिलांना अनेकदा अश्लिल मेसेज करून त्रास दिला जातो. असाच एक प्रकार ट्विटरवर समोर आला आहे. डॉ. हितेश गोहील नावाच्या व्यक्तीने अनेक महिलांना ट्विटरवर त्रास दिल्याचा प्रकार समोर आला आहे. नेमकं काय प्रकरण आहे आणि कसं उघडकीस आला आहे हे पाहूयात.

डॉ. थलामुस नावाच्या महिलेने ज्या पेशाने न्युरोसर्जन आहेत त्यांनी हितेश गोहिल या व्यक्तीने केलेल्या मेसेजेसचा स्क्रिनशॉट ट्विटरवर पोस्ट केला. त्यांच्या या ट्विटवर अनेक प्रतिक्रीया येऊ लागल्या. आणि या प्रतिक्रीयांमधून एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. एका महिलेने घेतलेल्या दृढ निर्णयामुळे हिंमत येऊन अनेक महिलांनी त्यांना आलेल्या मेसेजेसचे स्क्रिनशॉट शेअर केले आहेत.

डॉ. थलामुस यांनी एका पुरूषाकडून आलेले मेसेज असं लिहून एक स्क्रिनशॉट पोस्ट केला. ज्यामध्ये डॉ. हितेश गोहिल या व्यक्तीने त्यांना ट्विटरवर वैयक्तिक मेसेज करताना प्रतिक्रीया, मला आपल्याशी बोलायचंय असे मेसेज केले आहेत. तरीही डॉ. थलामुस या कोणतीही प्रतिक्रीया देत नाहीत म्हटल्यावर डॉ. गोहील याने, "समाजमाध्यमांवरील स्त्रिया या फक्त पैसा आणि आर्थिक पाठिंबा शोधत असतात. त्यांच्या मनात प्रेम आणि भावनेला काहीही जागा नसते. पुरूष महिलांची काळजी घेतात, पुरूष महिलांना गिफ्ट देतात, ते महिलांना सिनेमाला नेतात, हॉटेल्स मध्ये नेतात, शॉपिंग मॉल्समध्ये नेतात पण तरीही महिलांना पैसेच हवे असतात. मला कळत नाही की का त्या असं वागतात उलट महिलांनी या सगळ्यासाठी पुरूषांना पैसै द्यायला हवेत." अस भला मोठा मेसेज केलेला आहे.

त्यांच्या या ट्विट वर काही पुरूषांनी "त्याचं नाव तरी लपवायचं होतं त्याला बायका मुलं असतील", " असं कुणी पोस्ट करतं का डिलिट मारा तो स्क्रिनशॉट", अशा प्रतिक्रीया दिल्या आहेत. या दोन्ही प्रतिक्रीयांचे स्क्रीनशॉट काढून डॉ. थालामुस यांनी अपलोज केले आहेत.

फक्त डॉ. थलामुस नाही तर अशा अनेक महिलांना केलेत मेसेज

खरं प्रकरण तर या प्रतिक्रीयांमधून समोर आलं आहे. डॉ. थलामूस यांच्या पोस्टमुळे अनेक महिलांना बळ मिळालं आहे. अनेक महिलांनी त्यांच्या पोस्टवर कमेंट करत त्यांना डॉ. हितेश गोहील या व्यक्तीकडून आलेल्या मेसेजेसचे स्क्रीनशॉट्स टाकले आहेत. कनुप्रिया या महिलेने सेम पिंच म्हणत एक स्क्रिनशॉट पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये त्याच डॉ. गोहिल याने कनुप्रिया यांना नाव, वय, कुठे राहता अशी विचारणा केलेली आहे. कनुप्रिया यांनी प्रतिक्रीया दिली नाही म्हटल्यावर त्याने अश्लिल मेसेज पाठवला.

याशिवाय डॉ. गोहिल याने अंजुली यांना देखील असाच मेसेज पाठवला आहे. ज्यात त्यांना गाडीवर डबलसीट बसवून फिरावंसं वाटतंय आणि...... असा बराच मोठा मेसेज पाठवला आहे.

याशिवाय इशिता जोशी यांनी देखील, " ही सेम व्यक्ती माझ्यासह अनेक महिलांना अशीच मेसेज वर मेसेज पाठवत असते.", अशी प्रतिक्रीया दिली आहे.

दिशा या तरूणीने तर सेम व्यक्ती असं लिहित तीन स्क्रीनशॉट्स टाकले आहेत ज्यात त्या डॉ. गोहीलने अश्लिल मेसेज केलेले दिसून येत आहेत.

यामध्ये काही पुरूषांनी देखील कायदेशीर तक्रार करण्याचा सल्ला या महिलांना दिल्याचे दिसून येत आहे.

कोण आहे हा डॉ. हितेश गोहिल?

डॉ. हितेश गोहिल हे अकाऊंट तपासल्यावर प्रोफाईलमध्ये हे अकाऊंट फारसं ऍक्टीव्ह असल्याचे दिसून येत नाही. शेवटचं ट्विट १९ फेब्रुवारी रोजी केल्याच दिसून येत आहे. ही जी व्यक्ती आहे ही या महिलांना मेसेज करताना स्वतःला त्वचा रोग तज्ञ, कॉस्मेटोलॉजीस्ट, डरमेटोलॉजीस्ट सांगते.

Updated : 28 March 2022 11:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top