Home > News > मांजरी घाण करतात म्हणून एका दांपत्याची तीन महिलांना प्रचंड मारहाण

मांजरी घाण करतात म्हणून एका दांपत्याची तीन महिलांना प्रचंड मारहाण

मांजरी घाण करतात म्हणून एका दांपत्याची तीन महिलांना प्रचंड मारहाण
X

पाळीव प्राण्यांच्या प्रश्नांवरून मोठ मोठ्या सोसायट्यांमध्ये भांडणं, मारहाण असे प्रकार आता सर्रास घडू लागले आहेत. पण असेच प्रकार आता चाळीतही घडू लागले आहेत. नवी मुंबईत एका चाळीमध्ये मांजरींच्या घाण करण्यावरून एका दांपत्याने तीन महिलांना मारहाण केल्याची घटना घडली आहे.

मांजरीने घरी घाण केली असे खोटे बोलून तीन महिलांना शिवीगाळ व मारहाण केल्याचा प्रकार मिरची गल्ली पनवेल येथे घडला आहे. याप्रकरणी संतोष म्हात्रे आणि सारिका म्हात्रे यांच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतीक्षा पंढरीनाथ लबडे या मिरची गल्ली येथे त्यांची आई आशा आणि बहीण प्राची यांच्यासोबत राहतात. त्यांनी दोन मांजरी पाळलेल्या आहेत. ते राहत असलेल्या चाळीमध्ये संतोष म्हात्रे व त्यांची पत्नी सारिका हे राहतात. त्यांच्यात पाळीव मांजरीच्या कारणावरून नेहमी भांडणे होत असत.

मंगळवारी तुमच्या मांजरी आमच्या घरात येऊन घाण करतात असे बोलून सारिका हिने जोरजोराने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी संतोष म्हात्रे याने शिवीगाळ केली व लाकडी बांबूने प्राचीला मारहाण केली. त्यानंतर त्यांची आई आशा यांना धक्का देऊन खाली पडले व हातातील बांबूने आईच्या डोक्यात उपट घातली. त्यानंतर प्रतीक्षाला चेहऱ्यावर बांबूने मारले. या मारहाणीत तिघीही जखमी झाल्या आहेत. तिघींच्या डोक्यातून रक्त येऊ लागल्याने त्यांना पनवेलच्या जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Updated : 26 May 2022 7:19 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top