Home > News > देशातील कुस्तीपटूंना मोठा धक्का

देशातील कुस्तीपटूंना मोठा धक्का

देशातील कुस्तीपटूंना मोठा धक्का
X

आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या स्पर्धांमध्ये ज्या खेळातून भारताला हमखास पदकांची अपेक्षा असते. त्या कुस्ती खेळासाठी अत्यंत वाईट बातमी आहे. काही दिवसांपूर्वी ऑलिम्पिक पदक विजेत्या कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर गंभीर आरोप करत आंदोलन केलं होतं. ही घटना ताजी असतांनाच आज भारतीय कुस्ती संघाची युनायटेड वर्ल्ड रेसलिंग या जागतिक संघटनेनं सदस्यता रद्द केलीय.

भारतीय कुस्ती संघ अर्थात डब्ल्यूएफआई (Wrestling federation of India) ची सदस्यता ४५ दिवसांमध्ये निवडणुका न घेतल्यामुळं रद्द कऱण्यात आलीय. भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक १२ ऑगस्ट २०२३ पर्यंत घेणं अपेक्षित होतं. मात्र, पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयानं मतदानाच्या एक दिवस आधीच निवडणूकीवर बंदी घातली होती. त्याआधी वर्ल्ड रेसलिंग संघटनेनं भारतीय कुस्ती संघाला ४५ दिवसात निवडणूका घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतरही भारतीय कुस्ती संघाला निवडणूका घेता आल्या नाही. त्यामुळं संतापलेल्या वर्ल्ड रेसलिंगनं भारतीय कुस्ती संघाची सदस्यताच रद्द करण्याचा निर्णय घेतलाय.

आसाम उच्च न्यायालयानंही निवडणूकीला स्थगिती दिली. या निवडणूका ११ जुलैला होणार होत्या. मात्र, आसाम रेसलिंग एसोशिएशन आपल्या मान्यतेच मुद्दा पुढे करत उच्च न्यायालयात गेली. त्यावर सुनावणी करत आसाम उच्च न्यायालयानं निवडणूकांना स्थगिती दिली. त्यानंतर ऑगस्टमध्येही निवडणूका झाल्या नाहीत.

भारतीय कुस्तीमध्ये तणाव

भारतीय कुस्तीच्या क्षेत्रात मागील काही महिन्यांपासून तणावाचं वातावरण आहे. विनेश फोगाट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया सह अनेकांनी कुस्तीपटूंनी तत्कालीन अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करत आंदोलन पुकारलं होतं. त्यानंतर क्रीडा मंत्रालयानं फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांना निलंबित केलं होतं. पदाधिकाऱ्यांच्या निलंबनानंतर एडहॉक समिती फेडरेशनचं कामकाज पाहत होती.

१२ ऑगस्ट २०२३ मध्ये फेडरेशनच्या निवडणूका होणं अपेक्षित होतं. अध्यक्षपदासाठी ४ उमेदवारांनी नामांकन अर्ज भरला होता. त्यामध्ये एका महिलेचाही समावेश होता. अध्यक्षपदासाठी नामांकन भरणाऱ्यांमध्ये संजय सिंह यांनीही अर्ज भरला होता. त्यावरून वादही झाला होता. कारण संजय सिंह हे ब्रिजभूषण सिंह चे निकटवर्तीय समजले जातात.

Updated : 24 Aug 2023 10:02 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top