पुजेसाठी अगरबत्ती पेटवली आणि गॅस सिलेंडर फुटला..
X
घरात गॅस सिलेंडर वापरत असताना त्यासाठी काय खबरदारी घ्यावी याची जाणीव घरातील फक्त महिलांनाच नाही तर सर्व सदस्यांना असणे गरजेचे आहे. गॅस वापरत असताना काही खबरदारी हि कटाक्षाने पाळली पाहिजे. अनेक घरात गॅस कनेक्शन असते पण ते वापरण्याबाबत खूप अज्ञान घरातील मंडळींना असते आणि हेच अज्ञान अनेकवेळा जीवावर बेतू शकते. आता हीच घटना बघा ना पुजेसाठी अगरबत्ती पेटवली आणि गॅस सिलेंडर फुटला याला कारण हे लोकांमध्ये असलेलं अज्ञानच आहे .
गॅस सिलेंडरच्या स्फोटात 65 वर्षीय व्यक्ती गंभीररीत्या भाजल्याची घटना डोंबिवली पश्चिमेकडील उमेश नगर परिसरात घडली आहे. जखमीला उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हनुमंत मोरे असे जखमीचे नाव असून विष्णूनगर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. डोंबिवली पश्चिमेकडील उमेश नगर देवीचा पाडा परिसरात राहणारे हनुमंत मोरे आज पहाटे 3 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास उठले. सकाळी आंघोळ वगैरे करून देवपूजेसाठी अगरबत्ती पेटवण्यासाठी लाइटर पेटविण्यासाठी ते गेले असता सिलेंडरचा स्फोट झाला यावेळी घरात असलेले हनुमंत मोरे हे जवळपास 40% भाजले स्फोटचा आवाज आयकून शेजाऱ्यांनी घटनास्थळी धव घेत स्फोट झाल्याची माहिती त्याच्या मुलाला व पोलिसांना देत हनुमंत मोरे यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले . त्यानंतर त्यांच्या मुलाला याची माहिती मिळताच त्यांनी वडिलांना मुंबईच्या खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. तर दुसरीकडे पहाटे झालेला हा स्फोट इतका भीषण होता की या स्फोटात घराचे पत्रे तुटून उडाले तर स्वयंपाक घरातील बहुतांशी सामान जळाले आहे.या प्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून स्फोटच नेमकं कारण काय आहे याचा शोध पोलीस करत आहे.