Home > News > एका मुलीचा बलात्कार केल्याप्रकरणी ४४ वर्षीय नराधमाला पोक्सो कायद्या अंतर्गत अटक...

एका मुलीचा बलात्कार केल्याप्रकरणी ४४ वर्षीय नराधमाला पोक्सो कायद्या अंतर्गत अटक...

एका मुलीचा बलात्कार केल्याप्रकरणी ४४ वर्षीय नराधमाला पोक्सो कायद्या अंतर्गत अटक...
X

बलात्कार केलेल्या या २४ वर्षीय मुलीला गेल्या ८ वर्षात ४ वेळा गर्भपात करण्यास या नराधमाने प्रवृत्त केले आहे. मुंबईच्या गोरेगाव पश्चिम येथील बांगुरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. एका २४ वर्षीय मुलीने तिच्यावर एका ४४ वर्षीय नराधमाने गेल्या ८ वर्षांपासून सतत बलात्कार केल्याची तक्रार केली आहे. पीडित मुलीच्या तक्रारीनुसार, डिसेंबर २०१२ पासून लग्नाच्या बहाण्याने आरोपीने तिच्यावर वारंवार बलात्कार केला आहे।

जेव्हा या मुलीवर पहिल्यांदा बलात्कार झाला तेव्हा ही मुलगी १६ वर्षाची होती. जून २०१२ मध्ये हा कायदा लागू झाल्यानंतर ही घटना घडली आहे. त्यामुळे पोलीसांनी या गुन्ह्याची नोंद पोक्सो कायद्याअंतर्गत केली आहे. त्याचबरोबर या मुलीला गेल्या ८ वर्षांमध्ये आरोपीने ४ वेळा गर्भपात करायला लावला असल्याचं वृत्त फ्रि-प्रेस या वेब पोर्टलने दिले आहे.

पोलीसांनी फ्रि-प्रेस ला दिलेल्या माहितीनुसार पीडिता आणि आरोपी हे एकमेकांसोबत गेल्या अनेक वर्षांपासून प्रेम संबंधात होते. जेव्हा या दोघांचं प्रेम सुरू झालं तेव्हा मुलगी अल्पवयीन होती. आरोपी पीडित मुलीला वारंवार लग्नाचं आमिष दाखवून तिच्यासोबत मालाड आणि गोरेगाव परिसरातील हॉटेल्स आणि लॉजवर घेऊन जात, शारिरीक संबंध ठेवत होता.

काही महिन्यांआधी या पीडित मुलीने आरोपीला लग्नासाठी विचारले, पण आरोपीने लग्न करण्यासाठी नकार देत तिला धमकावण्यास सुरूवात केली. अखेर वारंवार या आरोपीने नकार देत तिचा शारिरीक उपभोग सुरू ठेवल्यामुळे तणावाखाली असलेल्या या पीडित मुलीने बांगुरनगर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी भारतीय दंड संहिता कलम ३१३ मनाविरोधात गर्भपात करणे, कलम ३७६(२) वारंवार बलात्कार करणे, कलम ४१७ फसवणूक करणे आणि कलम ५०६ गुन्हेगारी मानसिकता बाळगणे या कलमांसोबत पोक्सो कायद्यातील विषेश कलमांच्या अंतर्गत अल्पवयीन मुलीचे शारिरीक शोषण करणे अशा विविध कायद्याच्या अंतर्गत पीडित मुलीची तक्रार दाखल करून घेतली आहे.

एका मुलीचा बलात्कार केल्याप्रकरणी ४४ वर्षीय नराधमाला पोक्सो कायद्या अंतर्गत अटक... सदर प्रकरणाचा तपास लवकरात लवकर करून आरोपीला कठोर शिक्षा करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रीया बांगुर नगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकारी शोभा पिसे यांनी दिली आहे.


Updated : 27 Jan 2021 9:43 AM GMT
Next Story
Share it
Top