Home > News > धक्कादायक – १९ वर्षीय मुलीला २०० फुट खेचत नेत केली हत्या

धक्कादायक – १९ वर्षीय मुलीला २०० फुट खेचत नेत केली हत्या

धक्कादायक – १९ वर्षीय मुलीला २०० फुट खेचत नेत केली हत्या
X

महाराष्ट्राला हादरवणारी एक धक्कादायक घटना उस्मानपुरा भागात घडली. कॉलेजजवळून वोढत नेऊन विद्यार्थिनीची हत्या करण्यात आली आहे. ग्रंथी सुखप्रित कौर अस युवतीचे नाव असून एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.

शनिवारचा दिवस राज्याला हदरा देणारा ठरला.... भरदिवसा देवगिरी महाविदयालय जवळ तरुणीची भोसकून हत्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे. सुखप्रित कौर ही मृत तरुणी ही 19 वर्षीय विद्यार्थींनी आहे. ती बीबीएच्या प्रथम वर्गात शिकत होती. जवळपास 200 फुट ओढत नेऊन ही हत्या झाली असून घटना स्थळाचा सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागला आहे.

ओळखीच्या युवकाने केली हत्या......

प्रथम दर्शनी शरण सिंह या युवकाने हत्या केल्याची माहिती समोर येत आहे. शरण सिंह आणि सुखप्रित हे दोघेही एकाच परिसरात राहणारे असून एकमेकांना ते ओळखत होते. एकतर्फी प्रेमातून हत्या झाल्याचा संशय पोलिसांना असून वेदांतनगर पोलीस या प्रकरणाचा तपास घेत आहेत.

Updated : 24 May 2022 6:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top