Home > News > #Omicron मुंबई आणि वसई विरारमध्ये 8 रूग्ण, राज्यात संख्या 28 वर पोहोचली...

#Omicron मुंबई आणि वसई विरारमध्ये 8 रूग्ण, राज्यात संख्या 28 वर पोहोचली...

#Omicron मुंबई आणि वसई विरारमध्ये 8 रूग्ण, राज्यात संख्या 28 वर पोहोचली...
X

Omicron व्हेरिएंटने राज्यात शिरकाव केल्यानंतर दिवसंदिवस रूग्ण वाढतच आहेत. मंगळवारी वसई-विरार मध्ये Omicron चे 8 नवीन रूग्ण आढळले आहेत. यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 28 पोहोचली आहे. मंगळवारी आढळलेल्या Omicron बाधीत रुग्णांपैकी ७ रुग्ण मुंबईतले तर एक रुग्ण वसई-विरारमधील आहे.

पण एक दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यभरात आढळलेल्या २८ Omicron बाधितांपैकी ९ रूग्णांची Rtpcr टेस्ट निगेटिव्ह आली आहे. तसेच त्यांच्यावर उपचार झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ६८४ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ६८६ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर दिवसभरात २४ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील एक्टिव्ह केसेसची संख्या ६ हजार ४८१ झाली आहे.

Updated : 15 Dec 2021 9:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top