Home > News > 70 वर्षीय वृद्ध महिलेवर दारूच्या नशेत केला अत्याचार; गावकऱ्यांमध्ये संताप

70 वर्षीय वृद्ध महिलेवर दारूच्या नशेत केला अत्याचार; गावकऱ्यांमध्ये संताप

70 वर्षीय वृद्ध महिलेवर दारूच्या नशेत केला अत्याचार; गावकऱ्यांमध्ये संताप
X

उत्तर प्रदेशमधील ( uttar pradesh ) फतेहपूर जिल्ह्यातून माणुसकीला लाज आणणारी घटना समोर आली आहे. गावातील प्राथमिक शाळेत झोपलेल्या 70 वर्षांच्या वृद्ध महिलेवर नशेत असलेल्या एका व्यक्तीने बलात्कार केला आहे. ही घटना घडल्यानंतर आरोपींनी वृद्ध महिलेला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली.

वृद्ध महिलेचा आरोप आहे की, रविवारी रात्री उशिरा ती गावाच्या प्राथमिक शाळेत झोपली होती. पीडितेने सांगितले की गावातील एक व्यक्ती दारू पित होता. दारू पिल्यानंतर तो माझ्याकडे आला आणि खाटेवर झोपला, मग जबरदस्तीने अश्लील कृत्ये करण्यास सुरुवात केली. मी विरोध केला तेव्हा त्याने मला खाटेवरून खाली फेकले आणि माझे हात -पाय बांधून माझ्यावर बलात्कार केला. जेव्हा मी ओरडू लागलो, तेव्हा त्याने माझे तोंड त्याच्या हाताने दाबले.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून तपास सुरू केला आणि आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलिसांनी पीडित वृद्ध महिलेचा जवाब नोंदवून तिला वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले होते. या घटनेनंतर गावातील नागरिकांमध्ये मोठा संताप पाहायला मिळत आहे. पीडित महिला गावभर फिरून भिख मागते आणि रात्री शाळेत जाऊन झोपून आपलं जीवन जगत आहे.

Updated : 31 Aug 2021 3:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top