Home > News > थरारक पध्दतीने कार मधून ६५ लाखांची रोकड केली जप्त ; नक्की काय घडलं..

थरारक पध्दतीने कार मधून ६५ लाखांची रोकड केली जप्त ; नक्की काय घडलं..

थरारक पध्दतीने कार मधून ६५ लाखांची रोकड केली जप्त  ; नक्की काय घडलं..
X

अपर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या पथकाने खामगांव शहरामधून नांदुऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या एका संशयित कारचा फिल्मी स्टाईलने पाठलाग करून एका इसमाला ताब्यात घेऊन कारमधून ६५ लाखांची रोकड जप्त केल्याची घटना घडली आहे. अपर पोलीस अधीक्षक यांच्या पथकाला गुप्त माहितीच्या आधारे एका कार मधून रोकड घेऊन जात असल्याची माहिती मिळाली होती.

त्या माहितीच्या अनुषंगाने खामगाव शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती सदर संशयित कार खामगांव शहरातील टावर चौकात आली असता त्या कारला थांबवण्याचा प्रयत्न केला असता कार चालकाने नांदुऱ्याच्या दिशेने भरधाव वेगाने नेली. तात्काळ त्या कारच्या मागे एएसपी पथकाने पाठलाग करत कारला आमसरी फाट्या जवळ पकडून कारची झडती घेतली असता एका मोठ्या थैलीत लाखो रुपये आढळून आले. स्थानिक पथकाने रक्कम आणि कार व त्यामधील एका व्यक्तीला ताब्यात घेऊन शहर पोलीस स्टेशनला आणून त्यांची चौकशी करत ताब्यात घेतलेली रक्कम मोजण्याकरिता मशीन आणून रक्कम मोजण्याची कार्यवाही सुरू केली. त्यामध्ये ६५ लाखाची रोकड आढळून आली. यावेळी कारचा पाठलाग करताना अपर पोलीस अधीक्षक पथकातील दोन कर्मचारी त्यामध्ये जखमी झाले आहेत.
Updated : 7 July 2022 2:41 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top