Home > News > '5G' इंटरनेट बाबत मोठी बातमी; लवकरच भारतात येणार 5G..

'5G' इंटरनेट बाबत मोठी बातमी; लवकरच भारतात येणार 5G..

5G इंटरनेट बाबत मोठी बातमी; लवकरच भारतात येणार 5G..
X

इंटरनेटने इतकी क्रांती केली आहे की अवघ्या काही मिनिटांमध्ये आपण आपल्याला पाहिजे तो व्हिडिओ, पाहिजे ती माहिती कोणत्याही त्याठिकाणाहून सर्च करू शकतो. पूर्वीचा जर विचार केला तर तुम्हाला आठवत असेल काही MB चा डेटा आपण कित्येक दिवस वापरत होतो. पण आता दिवसाला 2-3 जीबी डेटा वापरून देखील डेटा पुरत नसल्याची तक्रार आपण नेहमी करत असतो. इंटरनेट दिवसेंदिवस क्रांती करत आहे. आणि याचाच पुढचा टप्पा आहे 5G. आता 5G भारतात येणार का? येणार असेल तर कधी येणार? किंवा सध्या 5G भारतात येणार असल्याच्या बातम्या सुरू झाल्यानंतर अनेकांनी त्यासाठी विरोध केला. तर या सगळ्यामध्ये नक्की 5G चे काय होणार? असा तुम्हाला प्रश्न पडला असेल.

तर लवकरच तुमचे हे सर्व प्रश्न संपणार आहेत. कारण, दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते की, ऑगस्टच्या अखेरीस '5G' इंटरनेट सुरू केले जाईल. स्पेक्ट्रमची विक्री सुरू झाली असून जूनपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता लवकरच सर्वांना 5G सेवा उपलब्द होण्याची शक्यता आहे.

तर आज जाणून घेऊया G फॉर जनरेशन म्हणजे काय? '5G' लाँच झाल्यानंतर इंटरनेटचा वेग किती असेल?

7.5 लाख कोटी रुपयांच्या स्पेक्ट्रमसाठी मेगा लिलाव

दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 5G इंटरनेट लॉन्च करण्यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी म्हंटल आहे की, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लिलावाबाबत डिजिटल कम्युनिकेशन समितीची (डीसीसी) बैठक होणार आहे. DCC ही दूरसंचार क्षेत्रातील निर्णय घेणारी सर्वात मोठी संस्था आहे. विभाग ट्रायच्या शिफारशींची वाट पाहत आहे.

ट्रायने सरकारला 1 लाख मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रमचा 7.5 लाख कोटी रुपयांना लिलाव करण्याची शिफारस केली होती. त्याची वैधता ३० वर्षे असेल असेही त्यांनी सांगितले होते. शासनस्तरावर ही प्रक्रिया सुरू झाली आहे. लिलाव संपल्यावर, 5G लाँच केले जाईल अस त्यांनी सांगितलं आहे.

इंटरनेटची 'G' पिढी नक्की काय आहे?

इंटरनेटसाठी वापरलेला 'जी' म्हणजे पिढी. पहिल्या पिढीप्रमाणे इंटरनेटला 1G म्हणतात. 1979 मध्ये सुरू झालेल्या इंटरनेटला 1G जनरेशन असे म्हटले जाते, ज्याचा 1984 पर्यंत जगभरात विस्तार झाला होता.

त्याचप्रमाणे 1991 मध्ये 2G इंटरनेट लाँच करण्यात आले. 2G इंटरनेटचा वेग 1G पेक्षा जास्त होता. 1G चा वेग 2.4 Kbps होता, 2G इंटरनेटचा वेग आता 64 Kbps झाला आहे.

यानंतर 1998 मध्ये 3G इंटरनेट, 2008 मध्ये 4G आणि 2019 मध्ये 5G इंटरनेट लाँच करण्यात आले. जरी 2019 मध्येच 5G इंटरनेट लाँच केले गेले असले तरी भारतात 11 वर्षांनंतर ते भारतात सुरू होणार आहे.

4G पेक्षा 5G इंटरनेट काय आणि कसे वेगळे आहे?

इंटरनेट नेटवर्कच्या पाचव्या पिढीला 5G म्हणतात. ही एक वायरलेस ब्रॉडबँड इंटरनेट सेवा आहे. जी लहरींद्वारे हाय-स्पीड इंटरनेट सेवा प्रदान करते. यात मुख्य रशियाचे तीन प्रकारचे फ्रिक्वेन्सी बँड आहेत.

1. कमी फ्रिक्वेन्सी बँड- क्षेत्र व्याप्तीमध्ये सर्वोत्तम, इंटरनेट स्पीड 100 Mbps

2. मिड फ्रिक्वेन्सी बँड- इंटरनेटचा वेग कमी बँडपेक्षा 1.5 Gbps जास्त

3. उच्च वारंवारता बँड- इंटरनेट गती कमाल 20 Gbps,

त्यामुळे आता ह्या हाय स्पीड इंटरनेटची सुविधा कधी उपलब्ध होणार आणि त्याचा वापर करता येणार यासाठी सर्वजणच आतुर आहेत.

Updated : 3 May 2022 6:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top