- एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री..
- कॉन्डोम कंपनीच्या आलीया व रणबीरला अनोख्या शुभेच्छा..
- म्हणून एकाच कुटुंबातील 9 जणांनी केली हत्या, अखेर गूढ उलगडलं..
- #MaharashtraPoliticalCrisis ; एकनाथ शिंदे प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात काय घडतंय?
- "मॅडम मी खूप टेन्शन मध्ये आहे, आमचा आमदार गुवाहाटीला आहे.." Audio Clip Viral
- आता या सहा मुली ही जाणार गुवाहाटीला..
- आदित्य ठाकरेंची थेट धमकी, आत एकनाथ शिंदेंचे काय होणार?
- Teesta Setalvad ; गुजरात दंगलीप्रकरणी तीस्ता सेटलवाड यांना गुजरात ATS घेतले ताब्यात..
- बंडखोर शिंदे गटाचे नाव ठरले 'शिवसेना...'
- महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या आरोग्यवारी अभियानाची सुरुवात

आणखीन एक महिला आमदार गीता जैन गुवाहाटी मध्ये दाखल..
X
एकनाथ शिंदे गटात जसजसा वेळ जाईल तसतसे सामील होणाऱ्या आमदारांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. आत्ताच अपक्ष आमदार गीता जैन व किशोर जोरगेवार हे गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत. हे दोन्ही आमदार आता एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत.
एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या चाळीसच्यावर आमदारांनी बंड केल्यानंतर सरकारकडे बहुमत नसल्याचे सांगितले जाते आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत ४०पेक्षा जास्त आमदार असल्याचा दावा केला आहे. आता एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत असलेल्या सर्व आमदारांना घेऊन गुहाटीमध्ये शक्तिप्रदर्शन केले आहे. टॉप शिंदे यांच्या बंधात तीन महिला आमदारांचा सहभाग होता आता अपक्ष आमदार गीता जैन या सुद्धा गुहाटी मध्ये दाखल झाल्या आहेत. त्या एकनाथ शिंदे गटात सहभागी झाल्या आहेत. त्यांच्यासोबत किशोर जोरगेवार हेदेखील शिंदे गटात सहभागी झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. जसा वेळ जाईल तसे एकनाथ शिंदे गटात सामील होणाऱ्या आमदारांची संख्या अधिक वाढू लागले आहे.
एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबत असलेले आमदारांचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये त्यांच्यासोबत तीन महिला आमदार सुद्धा दिसत आहेत. फोटोमध्ये दिसत आहेत त्या प्रमाणे यामिनि जाधव, लता सोनवणे, मंजुळा गावीत दिसत आहेत. त्यासोबतच आता अपक्ष आमदार गीता जैन या सुद्धा एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. खरं तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत सध्या 40 हून अधिक आमदार असल्याचे दिसत आहे.