Home > News > भारतीय सैन्यातील महिला अधिकाऱ्यांना कायम सेवेचा दर्जा द्यावा ; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

भारतीय सैन्यातील महिला अधिकाऱ्यांना कायम सेवेचा दर्जा द्यावा ; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

भारतीय सैन्यातील महिला अधिकाऱ्यांना कायम सेवेचा दर्जा द्यावा ; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
X

भारतीय सैन्यातील 39 महिला अधिकाऱ्यांना कायम सेवेत समाविष्ट करण्याचा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज दिला आहे. 39 महिला अधिकाऱ्यांना भारतीय सैन्यात समाविष्ट करण्यात आले असून न्यायालयाने त्यांना आता पुढच्या सात दिवसांमध्ये कायम सेवेचा दर्जा द्यावा असं सांगितला आहे. या पूर्वी भारतीय सैन्यात महिलांना अल्पकाळासाठी सेवेत दाखल करून घेण्यात येत होते. मात्र आता सर्वोच्च न्यायालयानं महिलांनादेखील भारतीय सैन्यात कायम सेवेत समाविष्ट करून घेण्याचा निर्णय दिला आहे.

खरतर भारतीय सैन्यातील महिला अधिकाऱ्यांच्या न्यायालयीन लढाईला आलेलं हे मोठं यश आहे. भारतीय सैन्यातील 71 महिला अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत रुजू करून घेण्यासाठी नकार देण्यात आला होता. त्यांना नकार दिल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर या प्रकरणावर आज सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं 39 महिला अधिकाऱ्यांना पात्र ठरवत त्यांना भारतीय सैन्यात कायमस्वरूपी समाविष्ट करून घेण्याचा निर्णय दिला आहे. ज्या 71 महिला अधिकारी या विरोधात सर्वोच्च न्यायालयात केल्या होत्या त्यातील 7 वैद्यकीय दृष्ट्या सक्षम नसल्यामुळे अपात्र ठरल्या तर बाकीच्या 25 पंचवीस महिला अधिकारी पात्र का नाहीत याविषयीचे सविस्तर उत्तर देण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत.

Updated : 22 Oct 2021 11:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top