Home > News > ३६ इंच संदीपला मिळाली ३१ इंची उज्ज्वलाची साथ

३६ इंच संदीपला मिळाली ३१ इंची उज्ज्वलाची साथ

३६ इंच संदीपला मिळाली ३१ इंची उज्ज्वलाची साथ
X

सध्या महाराष्ट्रात एका लग्नाची जोरात चर्चा सुरू आहे. आता तुम्ही म्हणाल लग्नाची काय चर्चा असणार? तर हे लग्न थोडं खास आहे. जळगावात उंचीने कमी आलेल्या संदीप व उज्वलाचा लग्नसोहळा पार पडला. संदीप सपकाळे हा ३६ इंच उंचीचा आहे तर वधू उज्ज्वला ही ३१ इंच उंचीची आहे. या नवदांपत्यासोबत अनेकांना सेल्फी काढण्याचा मोहदेखील आवरता आला नाही. त्यामुळे जळगावात या लग्नाची चर्चा चांगलीच रंगत आहे.पाहूयात या अनोख्या लग्न सोहळ्याची कहाणी..

शनिपेठेतील चौगुले प्लॉट परिसरातील वर संदीप संजय सपकाळे हा शिक्षित असून, तो शहरातील एका नामांकित सुवर्णपेढीत कामाला आहे. तर वधू ही धुळ्याची आहे. या लग्नाची चर्चा होण्याचे कारण म्हणजे या वधू आणि वराची उंची. ३६ इंच उंची असलेल्या संदीपला त्याची आयुष्याची साथीदार म्हणून ३१ इंची उज्ज्वला मिळाली आहे. सर्वसाधारण उंची असलेल्यांना देखील अनुरूप मुलगी वा मुलगा मिळणे अवघड जाते. त्यात कमी उंचीच्या वराला वा वधूला आपल्या उंचीच्या अनुरूप जोडीदार मिळणे अधिक अवघड असते; मात्र संदीप व उज्ज्वला दोघेही एकमेकांना अनुरूप आहे. मुलगा संदीप याची उंची कमी असल्याने आम्ही अनेक वर्षांपासून गावोगावी फिरून मुलगी बघत होतो.मात्र उंची कमी असल्याने त्याला मुलगी द्यायला कोणीच तयार होत नव्हते. मात्र शेवटी धुळे येथील मुलगी माझ्या मुलाला मिळाल्याने तिला मी माझ्या पोटच्या मुलीसारखी वागवे अशी प्रतिक्रिया संदीपच्या आईने यावेळी बोलताना व्यक्त केली.

Updated : 27 May 2022 8:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top