Latest News
Home > News > काल दिवसभरात 3 हजार 586 नवीन कोरोना बाधित रुग्ण

काल दिवसभरात 3 हजार 586 नवीन कोरोना बाधित रुग्ण

दिवसभरात 67 कोरोनाबधित मृत्यू

काल दिवसभरात 3 हजार 586 नवीन कोरोना बाधित रुग्ण
X

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने कमी जास्त होत आहे. राज्यात आता सर्व हळूहळू पूर्वपदावर येत असून. सरकार लोकांच्या लसीकरणावर्ती भर देत आहे. लवकरात लवकर दोन्ही नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण करण्यासाठी प्रयत्न चालू आहे. काल मंगळवार राज्यात नवीन 3 हजार 586 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून 4 हजार 410 बरे होऊन घरी गेले आहेत. दिवसभरात 67 कोरोनाबधित मृत्यू झाले आहेत. राज्याचा सद्याच्या मृत्यूदर 2.11 टक्के इतका आहे.

आजपर्यंत एकूण 62 लाख 24 हजार 270 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून एकंदरीतच सध्या राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97. 08 टक्के एवढे आहे. राज्यात दुसरी लाट आता कमी होताना दिसत असली तरी अजूनही नवीन कोरणा बाधित रुग्ण आढळून येत आहेत. पण दिलासादायक बातमी अशी की दररोज कोरोनातुन मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत.

Updated : 2021-09-18T12:08:50+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top