Home > News > संजय लीला भन्साळी यांच्या बद्दल दीपिका पदुकोण यांनी केला हा खुलासा

संजय लीला भन्साळी यांच्या बद्दल दीपिका पदुकोण यांनी केला हा खुलासा

संजय लीला भन्साळी यांच्या करियरला २५ वर्ष पुर्ण झाले त्यानिमीत्ताने दीपीका पदुकोण काय म्हणाल्या ते वाचा

संजय लीला भन्साळी यांच्या बद्दल दीपिका पदुकोण यांनी केला हा खुलासा
X

हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना बॉलिवूडमधील करियरला आज 25 वर्षे पूर्ण होत आहेत. 'खामोशी' ते 'पद्मावत' पर्यंत संजय लीला भन्साळी यांनी निर्मिती केलेल्या चित्रपटांमुळे अनेक कलाकारांना स्टारडम मिळाले. ब्लॅक, सावरीय, रामलीला, बाजीराव मस्तानी या सारख्या त्यांनी निर्मिती केलेल्या चित्रपटांनी चाहत्यांच्या मनावर एक वेगळीच छाप टाकली आहे. चित्रपटसृष्टीत आपल्याला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भानसाळी प्रोडक्शनने सोशल मीडियावरती एक पोस्ट प्रसारित केली. सध्या समाजमाध्यमांवर ती पोस्ट मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. या पोष्ट मध्ये त्यांनी ज्या कलाकारांसोबत काम केले त्यांचे काही संवाद त्यांचे प्रसिद्ध डायलॉग यांच्या आठवणींना उजाळा करून देत चाहत्यांची देखील आभार मानले आहे.

अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने देखील त्यांच्या चित्रपटसृष्टीतील प्रवासाला 25 वर्षे पूर्ण झाल्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने जर संजय लीला भन्साळी हे नाव नसते तर मी कुठेच दिसले नसते. आज मी एक व्यक्ती म्हणून जी कोणी आहे त्याचे कारण Sanjay Leela Bhansali हेच आहेत अश्या शब्दात deepika padukone एक छोटे पत्र शेअर केले आहे.


Updated : 10 Aug 2021 4:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top