Home > News > 'अरे माहीत नाय व्हय... कोरोनाचं आकडं कमी व्हायल्यात...' अस म्हणून निष्काळजी होऊ नका...

'अरे माहीत नाय व्हय... कोरोनाचं आकडं कमी व्हायल्यात...' अस म्हणून निष्काळजी होऊ नका...

राज्यात दररोज सापडणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त...

अरे माहीत नाय व्हय... कोरोनाचं आकडं कमी व्हायल्यात... अस म्हणून निष्काळजी होऊ नका...
X

राज्यात आता कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ही वाढताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात ज्या प्रमाणात नवीन कोरोना रुग्ण सापडत होते त्यापेक्षा कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या ही अधिक आहे. काल राज्यात बरे होणाऱ्यांची संख्या ही रोज सापडत असलेल्या कोरोना रुग्णांपेक्षा दुप्पट झाली होती. सध्या महाराष्ट्रात अजूनही कोरोनाची दुसरी लाट ओसरली नाही आहे. सरकार सर्वांना लसीकरण देण्याचा प्रयत्न करत आहे. या सगळ्यातून आता जे काही समोर येत आहे त्याप्रमाणे रुग्ण मोठ्या प्रमाणावर बरे होत आहेत ही अत्यंत दिलासादायक अशी बातमी आहे.

काल राज्यात नवीन 2 हजार 583 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून 3 हजार 836 बरे होऊन घरी गेले आहेत. दिवसभरात 28 कोरोनाबधित मृत्यू झाले आहेत. राज्याचा सद्याच्या मृत्यूदर 2.11 टक्के इतका आहे. आजपर्यंत एकूण 63 लाख 40 हजार 423 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून एकंदरीतच सध्या राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.18 टक्के एवढे आहे. महाराष्ट्राचा कोरोणा रुग्णांची संख्या जी आहे ती घटत आहे. ही आपल्यासाठी अत्यंत दिलासादायक अशी गोष्ट असली तरी ..'अरे माहीत नाय व्हय... कोरोनाचं आकडं कमी व्हायल्यात...' अस म्हणून निष्काळजी होण्यासारखी नक्कीच नाही.

Updated : 21 Sep 2021 2:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top