Home > News > २६ जानेवारीला १८९ कैदी होणार मुक्त

२६ जानेवारीला १८९ कैदी होणार मुक्त

२६ जानेवारीला १८९ कैदी होणार मुक्त
X

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त केंद्र सरकारनं विशेष सवलतींचा कार्यक्रम राबविण्यास सुरूवात केली आहे. त्याअनुषंगानं प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राच्या विविध तुरूंगात असलेल्या १८९ कैद्यांना मुक्त केलं जाणार आहे. ज्यामध्ये तीन कैदी हे ठाणे इथल्या मध्यवर्ती कारागृहातील आहेत. हे तीनही कैदी हत्येचा प्रयत्न आणि अन्य गुन्ह्यांसाठी शिक्षा भोगत आहेत.

ठाण्याच्या तुरूंगात ४ हजार ५६९ कैदी आहेत, त्यात १३२ महिला कैदी आहेत. तर ५२ कैदी हे ७० वर्षांपेक्षा अधिक वयाचे आहेत. आणि ३८६ कैदी हे वय वर्ष २० पेक्षा कमी आहेत. ठाण्याच्या तुरूंगाची क्षमता ही १ हजार १०५ इतकी आहे. मात्र, प्रत्यक्षात इथं ४ हजार ५६९ कैदी आहेत. सध्या महाराष्ट्राच्या विविध तुरूंगात ४३ हजार ९० कैदी आहेत. केंद्र सरकारच्या विशेष सवलतीच्या कार्यक्रमाअंतर्गत चांगली वर्तणूक असलेल्या कैद्यांना २६ जानेवारी २०२३ आणि १५ ऑगस्ट २०२३ ला मुक्त केलं जाणार आहे. यासाठी कैद्याचं वय, तुरूंगात भोगलेला कालावधी, अपंगत्व, आरोग्य यांच्या आधारावरही या कैद्यांना मुक्त करण्यासंदर्भातला निर्णय घेतला जातो.

Updated : 2023-01-24T10:42:37+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top