Latest News
Home > News > आई वडिलांवर ओझे नको म्हणून 17 वर्षीय तरुणीची आत्महत्या...

आई वडिलांवर ओझे नको म्हणून 17 वर्षीय तरुणीची आत्महत्या...

आई वडिलांवर ओझे नको म्हणून 17 वर्षीय तरुणीची आत्महत्या...
X

'आई वडिलांवर ओझे नको म्हणून मी माझे जीवन संपवत आहे' अशी चिठ्ठी लिहून एका 17 वर्षीय युवतीने आत्महत्या केली आहे. अमरावती जिल्यातील छिदवडी या गावात ही घटना घडली असून या मुलीचे वडील शेतमजुरी करतात. वडिलांना मिळणाऱ्या उत्पनामध्ये उदरनिर्वाह करणे बिकट झाल्यामुळे या तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली आहे.

आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत या तरुणीने 'आई-वडिलांवर ओझे नको म्हणून मी माझं जीवन संपवत आहे. वडिलांना शेतमजुरी व तीन एकर शेती करून उदरनिर्वाह करावा लागतो. त्यात सतत होत असलेली नापीक जमीन व घरातील आर्थिक परिस्थितीमुळे आयुष्य जगणं दिवसेंदिवस कठीण होत आहे. दोन बहिणी, एक लहान भाऊ अशा सर्वांच्या पोटापाण्याचा आणि भविष्याचा प्रश्न बिकट आहे. सध्याची महागाई आणि मुलांचे शिक्षण हे सर्व करत असताना आईवडिलांची प्रचंड ओढाताण होत आहे. त्यामुळे कुटुंबातील लोकांवर माझे ओझे कमी व्हावे म्हणून मी माझे जीवन संपवत आहे. असे या तरुणीने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे.

Updated : 23 Oct 2021 7:42 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top