Home > News > कोरोनामुळे भारतात 13 कोटी मुली शाळाबाह्य...

कोरोनामुळे भारतात 13 कोटी मुली शाळाबाह्य...

कोरोनामुळे भारतात 13 कोटी मुली शाळाबाह्य...
X

मागील दोन वर्षांपासून संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आहे. खरतर या कोरोना महामारीचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला. याच महामारीचा शैक्षणिक क्षेत्रावर देखील खूप मोठा परिणाम झाला आहे. भारतात कोरोनामुळे 29 कोटी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे. त्यापैकी १३ कोटी मुली आहेत. युनेस्कोच्या मते, भारतातील एकूण शाळा सोडणाऱ्या मुलींपैकी निम्म्याहून अधिक मुली शाळेत परतत नाहीत. कोरोनामुळे पूर्व प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरील 11 कोटींहून अधिक मुले अजूनही शालेय शिक्षणापासून दूर आहेत. जगातील एकूण विद्यार्थ्यांपैकी हे प्रमाण ७.५% आहे.

कोरोनामुळे जगभरातील शाळा सरासरी 5 महिने बंद होत्या. याचा परिणाम फक्त मुलांच्या शिक्षणावरच नाही तर त्यांच्या पोषणावर आणि त्यांच्या भविष्यातील उत्पन्नावर देखील होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. भारतासह देशात अनेक दिवस शाळा बंद होत्या, याचा किती मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला? व त्याचा भविष्यात काय परिणाम दिसेल? हे सगळं समजून घेण्यासाठी प्रथम भारताची स्थिती समजून घेऊया...

कोरोना केसेस वाढल्यानंतर मार्च 2020 मध्ये भारतातील शाळा बंद करण्यात आल्या होत्या. त्यावेळी बंद झालेल्या शाळा 18 महिने बंद राहिल्या. या कालावधीत शाळांमध्ये ऑनलाइन वर्ग सुरू असले तरी अनेक कारणांमुळे ऑनलाइन वर्गांमध्ये काही त्रुटी होत्या. सध्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रोटोकॉलसह शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. भारत हा जगातील अशा देशांपैकी एक आहे जिथे शाळा सर्वात जास्त काळ बंद राहील्या. शाळा बंद झाल्यामुळे याचा 29 कोटी मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला. यामध्ये 14 कोटी मुली आणि 15 कोटी मुले आहेत. सर्वाधिक १३ कोटी मुले माध्यमिक शाळांमध्ये आहेत. भारतात शाळा सोडणाऱ्यांची संख्या अरुणाचल प्रदेशात सर्वाधिक आहे. अरुणाचल प्रदेशातील शाळा गळतीचे प्रमाण ३४.३ इतके आहे. हे प्रमाण देशातील सर्वाधिक आहे. त्याच वेळी, पंजाबमध्ये हे प्रमाण सर्वात कमी म्हणजे 1.6 इतके आहे. ही सर्व आकडेवारी 2019-20 या शैक्षणिक वर्ष्यातील आहे. लॉकडाऊननंतर हे आकडे आणखीन वाढले आहेत. त्रिपुरा, आसाम, मध्य प्रदेश, मेघालय, नागालँडमध्ये माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण 25% पेक्षा जास्त झाले आहे.


मुलांपेक्षा मुलींचे गळतीचे प्रमाण जास्त



वय वर्ष 12 ते 17 या दरम्यानच्या जवळपास एक करोड मुलींची शाळा बंद झाली. आता त्या परत शाळेत येण्याची संभावना फार कमी आहे. भारतात अशाप्रकारे शाळेतून ड्रॉपआउट झालेल्या मुलींपैकी 53 टक्के मुली पुन्हा शाळेत येत नाहीत. त्याचा परिणाम फक्त त्या मुलींच्या शिक्षणावरच नाही तर घरगुती हिंसाचार, लोकसंख्या वाढ, त्यांचे आरोग्या यावरती देखील होणार आहेत.

Updated : 11 Nov 2021 7:07 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top