Home > News > महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर; यंदाच्या निकालातही मुलींचा बोलबाला

महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर; यंदाच्या निकालातही मुलींचा बोलबाला

आज बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, यंदा मुलींनी उत्तम कामगिरी करत बाजी मारली आहे.

महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर; यंदाच्या निकालातही मुलींचा बोलबाला
X

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला. यंदा मुलींनी उत्तम कामगिरी करत बाजी मारली असून, सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला आहे.

राज्यभरात घेण्यात आलेल्या या परीक्षेत विज्ञान, कला आणि वाणिज्य या तिन्ही शाखांमध्ये विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली आहे. कोकण विभागाने सर्वोत्कृष्ट निकाल देऊन अव्वल स्थान पटकावले आहे. राज्यातील एकूण निकालाची टक्केवारी 93.37% इतकी आहे.

शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकालाबद्दलची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, गेल्या वर्षीपेक्षा यंदा निकालाचा टक्का वाढला आहे. निकालाचा टक्का वाढला आहे. पुणे 94.44 टक्के, नागपूर 92.12 टक्के, संभाजी नगर 94.08 टक्के, मुंबई 91.95 (सर्वात कमी), कोल्हापूर 94.24 टक्के, अमरावती 93 टक्के, नाशिक 94.71 टक्के, लातूर 92.36, कोकण 97.51 टक्के (सर्वात जास्त)

154 विषयासाठी परीक्षा घेण्यात आली. एकूण परीक्षार्थी 14 लाख 23 हजार 970 उत्तीर्ण परीक्षार्थी 13 लाख 29 हजार 684. 154 विषयांपैकी 26 विषयांचा निकाल शंभर टक्के आहे. विज्ञान विभाग निकाल 97.82 कला शाखा निकाल 85.88, वाणिज्य विभाग निकाल 92.18, व्यवसाय अभ्यासक्रम 87.25 गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीचा निकाल 2.12 ने जास्त लागला आहे.

बारावीच्या परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 दरम्यान घेण्यात आल्या. यंदा देखील राज्यात कॉपीमुक्त परीक्षा घेण्यात आल्या. परीक्षा केंद्रांवर यंदा विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता आणि भरारी पथकांच्या संख्येतही वाढ करण्यात आली होती.

आशा पद्धतीने परीक्षेत चोखबंदोबस्त केला होता, गेल्यावर्षी प्रमाणे याही वर्षी मुलींनी बाजी मारली असून बारावीच्या निकालात मुलींचा बोलबाला असल्याचे चित्र दिसत आहे.

आता बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आहे ती दहावीच्या निकालाची. शिक्षण मंडळाने आधीच स्पष्ट केले आहे की, दहावीचा निकाल मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात जाहीर केला जाईल. दहावीच्या निकालाचे काम अंतिम टप्प्यात आहे, परंतु अद्याप निकालाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

Updated : 21 May 2024 8:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top