Home > News > ''...तर मला चौकात फाशी द्या' संसदेत सुप्रिया सुळे संतापल्या

''...तर मला चौकात फाशी द्या' संसदेत सुप्रिया सुळे संतापल्या

...तर मला चौकात फाशी द्या  संसदेत सुप्रिया सुळे संतापल्या
X

राज्यात भाजप विरुध्द महाविकास आघाडी संघर्ष सुरू आहे. त्यापार्श्वभुमीवर संसदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपला चांगलेच धारेवर धरले. तर भाजप केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. त्यावेळी बोलताना मला विजय चौकात फाशी द्या, अशी संतप्त प्रतिक्रीया सुप्रिया सुळे यांनी दिली.

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात भाजप विरुध्द महाविकास आघाडी संघर्ष सुरू आहे. तर आता हा संघर्ष टोकाला गेला आहे. त्यातच भाजप केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याची टीका राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केली जात आहे. त्याच मुद्द्यावरून सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधताना माझी चुक असेल तर मला विजय चौकात फाशी द्या, अशी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केली.

सुप्रिया सुळे लोकसभेत बोलताना म्हणाल्या की, केंद्र सरकारकडून सांगण्यात येते की ईडी ही स्वतंत्र तपास यंत्रणा आहे. तर मग पुढील चार पाच दिवसात कोणावर धाड पडणार आहे हे ट्वीटरवर आम्हाला कसं समजतं? पुढचा नंबर कोणाचा हे सांगणारे नेते भविष्य सांगतात का? पुढील छापा कोणावर पडणार आहे हे त्यांना कसं माहित होतं? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला.

यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, आमच्याकडून काही चुकले तर मला इथं नाही विजय चौकात फाशी द्या. आमचं चुकलं तर आमच्यावर खटला चालवा. परंतू ईडी आणि सीबीआयचा सुरू असलेला गैरवापर चुकीचा आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची हे लक्षात ठेवावं की आयुष्य खूप कलाटणी देतं. आम्हीही सत्ताधारी बाकांवर बसलो आहोत. पीएमएलए कायदा करणे ही आमची चूक आहे. पण त्यासाठी तुम्ही आम्हाला फाशी देणार का? असा संतप्त सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला. तसेच तुम्ही पारदर्शक आणि न्याय काम करा, अशी विनंतीही यावेळी सुप्रिया सुळे यांनी केली.Updated : 27 March 2022 3:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top