Home > News > सानिया मिर्झाचा टेनिसमधून संन्यास

सानिया मिर्झाचा टेनिसमधून संन्यास

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने ऑस्ट्रिलियन ओपन टेनिसमध्ये पराभव पत्करावा लागल्यानंतर निवृत्तीची घोषणा केली.

सानिया मिर्झाचा टेनिसमधून संन्यास
X

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने ऑस्ट्रिलियन ओपन टेनिसमध्ये पराभव पत्करावा लागल्यानंतर निवृत्तीची घोषणा केली.

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने ऑस्ट्रेलियातील पराभवानंतर अखेर निवृत्ती जाहीर केली आहे. तर तिने आतापर्यंत सहा ग्रँड स्लॅम अजिंक्यपदं मिळवली आहेत. त्यापैकी तीन महिला दुहैरीत आणि तीन मिश्र दुहेरीत मिळवले आहेत. त्यामुळे सानिया मिर्झा देशात प्रसिध्द आहे. तर तिने एकेरीच्या चौथ्या फेरीत धडक मारली होती. त्यामुळे सानिया मिर्झाला देशातील सर्वोत्तम टेनिसपटू म्हणून ओळखले जात होते.

ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत सानियाचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर तिने निवृत्तीची घोषणा केली. यावेळी बोलताना सानिया म्हणाली की, टेनिसमधून निवृत्ती घेण्याची अनेक कारणे आहेत. तर सध्या मला रिकव्हरीसाठी जास्त वेळ लागत आहे. त्यामुळे मी खेळणार हे मनाला समजावणे खूप कठीण आहे. तर मी माझ्या तीन वर्षाच्या मुलाला घेऊन प्रवास करताना त्याचा जीव जोखमीत घालणे मला योग्य वाटत नाही. याबरोबरच आता माझे शरीर पहिल्यासारखी साथ देत नाही. माझ्या गुडघेदुखीचा त्रास वाढत आहे. मी हे कारण सांगत नाही की मी यामुळे हारले. पण सध्या मला रिकव्हरी होण्यासाठी खूप वेळ लागत आहे, असे सानिया मिर्झाने सांगितले.

पुढे सानियाने सांगितले की, 2022 चा हंगाम तिच्यासाठी शेवटचा असणार आहे. सानिया आणि तिची युक्रेनची जोडी असलेली नदिया किचनोकला स्लोव्हेनियाच्या तमारा झिदानसेक आणि काजा जुवान यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे सानिया मिश्र दुहेरीच अमेरीकेच्या राजीव रामसह सहभागी होणार आहे.

सानियाची कारकीर्द-

सानिया मिर्झाने आतापर्यंत सहा ग्रँडस्लॅम चषक जिंकले आहेत. तर 2009 मध्ये सानियाने मिश्र दुहेरीत ऑस्ट्रेलियन ओपन, 2012 साली फ्रेंच ओपन, 2014 साली युएस ओपन वर नाव कोरले. त्यानंतर सानियाने 2015 साली महिला दुहेरीत विम्बल्डन आणि युएस तर 2016 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनवर नाव कोरले होते.

मुळची हैद्राबादची असलेल्या सानियाने 2003 सालापासून टेनिस खेळायला सुरूवात केली. तर 19 व्या वर्षी भारताचे प्रतिनिधीत्व करताना तिने दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल मानांकन मिळवले. तर सानियाने आपल्या उज्वल खेळातून जागतिक क्रमवारीत भारतीय महिला म्हणून टेनिस इतिहासात 27 वे स्थान मिळवण्याचा पराक्रम केला.

Updated : 19 Jan 2022 2:42 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top