Home > News > मी पुन्हा येत अहे...अमृता फडणवीस यांचा सूचक इशारा

मी पुन्हा येत अहे...अमृता फडणवीस यांचा सूचक इशारा

मी पुन्हा येत अहे...अमृता फडणवीस यांचा सूचक इशारा
X

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आज सकाळी एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी "आओ कुछ तूफ़ानी करते है, कल शाम .... मी पुन्हा येत अहे !!!" असं म्हटलं आहे. त्यामुळे आता काय बोलणार आहेत यावर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

मागील काही दिवसांपासून आपण जर पाहिलं तर NCP चे प्रवक्ते नवाब मलिक यांनी अमृता फडणवीस यांना टार्गेट केले होते. Drug peddler सोबतचा त्यांचा एक फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता आणि यानंतर अमृता फडणवीस यांनी "माझ्या वाट्याला आला तर बघून घेईन असं म्हटलं होतं." त्यामुळे हे ट्विट नक्की कशासंदर्भात आहे? नवाब मलिक यांनाच हा इशारा आहे का? की काही अन्य बाबती संदर्भात त्यांनी हे ट्विट केला आहे याकडे आता सर्वांचे लक्ष लागून लागले आहे.

Updated : 19 Nov 2021 5:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top