मुंबईतील झेन सदावर्ते हिस राष्ट्रीय वीरता पुरस्कार जाहीर
X
महाराष्ट्राच्या दोन बालकांना राष्ट्रीय वीरता पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मुंबईची झेन सदावर्ते आणि औरंगाबादचा आकाश खिल्लारे या दोघांची निवड राष्ट्रीय वीरता पुरस्कारासाठी झाली आहे. देशभरातून १० मुली आणि १२ मुलं अशा एकूण २२ जणांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातल्या दोघांचा समावेश आहे.
मुंबईतील सहावीत शिकवणाऱ्या झेन सदावर्ते हिने जागरूकता दाखवत 13 जणांचे प्राण वाचवले. मुंबईतील क्रिस्टल टॉवर या इमारतीला आग लागली होती. यावेळी शाळेत शिकलेल्या धड्यातील माहितीचा वापर तिने या प्रसंगातून सुटका होण्यासाठी केला.मुंबईतील क्रिस्टल टॉवर या इमारतीला आग लागली. आग लागल्यामुळे धुराचे लोट पसरतात आणि ऑक्सिजनचं प्रमाण कमी होऊन कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढते. अशावेळी एखाद्याचा मृत्यू गुदमरुन होण्याची शक्यता असते. मात्र अशा व्यक्तीच्या तोंडावर ओले कापड ठेवल्यास श्वास घेण्यास त्रास होत नाही. याच धड्यातील माहितीचा वापर करुन झेन सदावर्तेने १३ जणांचे प्राण वाचवले. या शौर्याचा गौरव म्हणून तिचा सन्मान करण्यात येणार आहे.