Home > रिपोर्ट > कठीण काळात साथ देणारी युवीची अर्धांगिनी

कठीण काळात साथ देणारी युवीची अर्धांगिनी

कठीण काळात साथ देणारी युवीची अर्धांगिनी
X

क्रिकेट म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते सचिन, युवराज, हरभजन सिंह, महेंद्रसिंग धोनी, विराट कोल्ही इ. क्रिकेटर... हा खेळ तुमच्या-आमच्या जिव्हाळ्याचा विषय... आपण नेहमी क्रिकेट आणि क्रिकेटर यांना मैदानावर बघत असतो. त्यांचे खेळ बघून तर गल्ली-गल्लीतले अनेक मुलं क्रिकेट शिकलेत. मात्र असं जरी असलं तरी या क्रिकेटरच्या आयुष्यात अनेक घडामोडी घडत असतात कधी त्यांना आपल्या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी अनेक संकटांचा सामना करावा लागतोय.

काल (सोमवार) युवराज सिंह याने पत्रकार परिषद घेत क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याच्या या निर्णयाने संपूर्ण देशात क्रिकेटचा श्वास गेल्याची चर्चा सुरु झाली. त्यात त्याच्या होणाऱ्या बायको हॅजलने युवीविषयी एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केली.

युवराजची पत्नी ही अभिनेत्री हॅजल कीच असून तिने सलमान खान, करिना कपूर यांच्या बॉडीगार्ड या चित्रपटात काम केले होते. युवराजने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर हॅजलने इन्स्टाग्रामवर एक भावुक पोस्ट लिहिली आहे. तिने युवराजने निवृत्तीची घोषणा केली त्या पत्रकार परिषदेचा फोटो पोस्ट करत त्यासोबत लिहिले आहे की, एका पर्वाचा अंत झाला. तुझी पत्नी असण्याचा मला अभिमान आहे. आता आयुष्यातील एका नव्या पर्वाला सुरुवात करूया...

https://www.instagram.com/p/Byhd_qEABVa/?utm_source=ig_embed

हॅजल कीचने युवराजच्या चांगल्या-वाईट काळात साथ दिली आहे. युवराज सिंह याला कॅन्सर आजार झाला तेव्हा तिने त्याची साथ न सोडता त्याला बर केलं. युवीच्या आजारपणाच्या काळात त्याला प्रेम, काळजी, जीव लावणारी त्याची होणारी बायको हॅजल कीच... खरचं बायकोच्या प्रेमात खूप शक्ती असते असं फक्त आपण ऐकलं आहे पण ते हॅजलच्या रुपात पाहिलं ही आहे. युवराज सिंह आणि हॅजल कीचची जोडी ही खरचं वेगळीच आहे.

लवकरच ते विवाहबंधनात अडकणार आहे. नुकतीचं ही जोडी सोनी टीव्ही वरील कपील शर्मा शो या कार्यक्रमात आली होती. यावेळी युवराजने त्यांच्या प्रेमकहाणीचे काही मनोरंजक किस्से सांगितले आहेत.

https://www.instagram.com/p/Bt1zcs-jrk4/?utm_source=ig_embed

“तीन वर्षांपासून मी तिला कॉफी घेण्यासाठी भेटायला जाण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक वेळी मी तिला मेसेज पाठविला तेव्हा ती हा म्हणायची मात्र ठरलेल्या दिवशीच फोन बंद करायची.'' असे अनेक किस्से त्याने सांगितले.

एक वर्षाच्या भेटीगाठीनंतर हॅजेलने युवीच्या प्रेमाला होकार दिला. युवराजच्या वाढदिवसाच्या दिवशी हे दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.

Updated : 11 Jun 2019 6:20 AM GMT
Next Story
Share it
Top