जात पंचायतीच्या जाचाला कंटाळुन तरुणीची आत्महत्या
X
पुरोगामी म्हणविणाऱ्या महाराष्ट्रात जात पंचायत नामक न्यायव्यवस्था अद्यापि अस्तित्वात आहेत. सामाजिकदृष्टय़ा मागासलेल्या राज्यांमध्येच अश्या घडलेल्या घटनांचा प्रमाण वाढलेलं आहे. एकीकडे कौमार्य चाचणीविरोधात कंजारभाट समाजातील तरूणी आवाज उठवत असताना दुसरीकडे मात्र समाजाच्या विविध वर्गातील लोकांकडून जाचाला कंटाळुन गप्प राहावे लागते. अशीच घटना महाराष्ट्रात जळगाव एमआयडीसी येथील एका कंजारभाट समाजातील तरूणीने जात पंचायतीच्या जाचाला कंटाळुन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती स्वतः विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. त्यांनी एक ट्विट करत "#महाराष्ट्र जळगाव एमआयडीसी येथील कंजारभाट समाजातील तरूणीने जात पंचायतीच्या जाचाला कंटाळुन आत्महत्या केली आहे.याबाबत जळगाव पोलीस अधीक्षक,यांच्याशी बोलुन दोषींचा तपास करून गुन्हा दाखल करा या सुचना दिल्या.या विषयी ना.डाॅ.नीलम गोऱ्हे यांची भुमिका व प्रतिक्रिया" असं ट्विट केलं असून या प्रकरणाबाबत जर जात पंचायतीच्या दबावाखाली असे गुन्हे घडत असतील तर त्याचे सर्व धागे-दोरे समोर येऊन योग्य ती कारवाई गुन्हेगारांनवर झाली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.
https://youtu.be/TGRCGD1cw0s