Home > रिपोर्ट > हनी सिंगचे 'मखना'; महिला भडकल्या !

हनी सिंगचे 'मखना'; महिला भडकल्या !

हनी सिंगचे मखना; महिला भडकल्या !
X

रॅप आणि टॉप सिंगर असलेला पंजाब द मुंडा हनी सिंग अडचणीत आला आहे. त्याचे 'मखना' हे गाणे सध्या भलतेच गाजत असले तरी त्याचे हे गाणे ऐकून रणरागिणींचा पारा भलताच चढला आहे. या गाण्यातून महिलांच्या भावना दुखावल्या असून पंजाबच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा मनीषा गुलाटी यांनी रॅपर हनी सिंगला नोटीस पाठवली आहे.

'मखना' या गाण्यात हनी सिंगने महिलाबद्दल अशोभनीय भाषा वापरली असल्याचे यात म्हटले आहे. याविरोधात लवकरच एफआयआर दाखल करणार असल्याचे पंजाब महिला आयोगाच्या अध्यक्ष मनीषा गुलाटी यांनी म्हटले आहे. राज्याचे पोलीस महासंचालक यांनाही गुलाटी यांनी लेखी कळवून हनी सिंगविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. इतकेच नाही तर टी सिरीस कंपनीचे भूषण कुमार, आणि प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई आणि चौकशी करण्याची मागणी या नोटिशीत करण्यात आली आहे.

हनी सिंगच्या गाण्यात काय?

हनी सिंगच्या गाण्यात 'मैं हूँ वूमन इझर' असा उललेख आहे. २०१३ मध्ये 'मै हूं बलात्कारी' या गाण्यामुळे हनी सिंग वादात सापडला होता. पंजाब आणि हरियाणा न्यायालयात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, प्रेक्षकांनी हनी सिंगच्या 'मखना' गाण्याला अक्षरशः डोक्यावर घेतले होते. हे गाणे महिनाभरातच १०० मिलियनहून अधिक लोकांनी पाहिले होते. त्याच्यासोबत या गाण्यात नेहा कक्करसुद्धा पाहायला मिळाली होती.

https://youtu.be/1bvYHkQxWmg

Updated : 4 July 2019 9:30 AM GMT
Next Story
Share it
Top