Home > रिपोर्ट > महिला काँग्रेसने बीसीसीआयला करून दिली ‘या’ रेकॉर्डची आठवण

महिला काँग्रेसने बीसीसीआयला करून दिली ‘या’ रेकॉर्डची आठवण

महिला काँग्रेसने बीसीसीआयला करून दिली ‘या’ रेकॉर्डची आठवण
X

भारत विरुद्ध बांग्लादेश टी-20 सामना अतिशय रंगतदार झाला. सुरुवातीला हा सामना बांग्लादेशच्या दिशेने झुकत असतानाच दिपक चहर याने हॅट्रिक घेऊन सामन्याचे चित्र पालटले.

एखाद्या क्रीडा संघटनेला आपल्या खेळाबद्दल सर्व माहिती असणे गरजेचे असते. पण जगातील सर्वात मोठी समजली जाणारी संघटना असलेल्या बीसीसीआयलाच आपल्या खेळातील विक्रमांचा विसर झाल्याचे पाहायला मिळाले. पण बीसीसीआयची ही चूक झाल्यावर त्यांना महिला काँग्रेसने भानावर आणल्याचे पाहायला मिळत आहे.

बीसीसीआयने एक ट्विट करत दिपकने भारताकडून ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये पहिली हॅट्ट्रिक घेतली असे लिहिले होते. बीसीसीआयचे सचिन जय शहा यांनीदेखील याच प्रकारचे ट्विट करत दिपकचे अभिनंदन केले होते. पण महिला काँग्रेसने या दोघांचीही चूक झाल्याचे दाखवून दिले. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून एकता बिश्तने पहिली हॅट्ट्रिक घेतल्याचे ट्विटरच्या माध्यमातून दाखवून दिले आहे.

Updated : 12 Nov 2019 11:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top