Home > रिपोर्ट > 'मनसे'च्या शॅडो कॅबिनेटमधील 'या' महिला देणार ठाकरे सरकारला टक्कर

'मनसे'च्या शॅडो कॅबिनेटमधील 'या' महिला देणार ठाकरे सरकारला टक्कर

मनसेच्या शॅडो कॅबिनेटमधील या महिला देणार ठाकरे सरकारला टक्कर
X

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) १४ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आज नवी मुंबईत वाशी येथे 'शॅडो कॅबिनेट'ची घोषणा करण्यात आली. यावेळी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शॅडो कॅबिनेटला त्यांच्या पुढील कामासाठी शुभेच्छा देत, सरकारचे वाभडे काढणं हे शॅडो कॅबिनेटचं महत्तवाचं काम आहे असं सांगितलं. मात्र, जिथे वाभडे काढयचे तिथेच काढा आणि जिथे सरकार चांगलं काम करेल तिथे कौतुकही करा असं बजावलं. आरटीआय टाकून ब्लॅकमेल करणं किंवा परस्पर पत्रकार परिषद घेणं चालणार नाही अशी ताकीदही यावेळी त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिली.

शॅडो कॅबिनेटमधील काही खात्यांमध्ये महिलांचाही समावेश करण्यात आलाय. यामध्ये शालिनी ठाकरे (Shalini Thackeray) यांचाही समावेश आहे. प्रति कॅबिनेट मधील महिलांची नाव पुढीलप्रमाणे...

महिला व बालविकास

शालीनीताई ठाकरे

सुनिता चुरी

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

रीटा गुप्ता

कुंदा राणी

सार्वजनिक बांधकाम विभाग

सुनिता शेवलकर

कौशल विकास व उद्योजकता

स्नेहल जाधव

पर्यावरण

रुपाली पाटील

खारजमिनी, पुनर्विकास आणि भुकंप पुनर्वसन

अनिशा माजगावकर

Updated : 9 March 2020 9:23 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top