Home > रिपोर्ट > भटक्या विमुक्तांच्या परिचयाचा 'बाईचा दिवस म्हणजे महिला दिन'

भटक्या विमुक्तांच्या परिचयाचा 'बाईचा दिवस म्हणजे महिला दिन'

भटक्या विमुक्तांच्या परिचयाचा बाईचा दिवस म्हणजे महिला दिन
X

जागतिक महिला दिनानिमित्ताने भटके विमुक्तांची पुण्यातील फुले नगर वस्तीमध्ये पहिलीच महिला दिन साजरा करण्याची वेळ होती.भटक्या विमुक्त जमातीतील सात ते आठ जमातीतील महिला ह्या परिषदेसाठी उपस्थितीत होत्या. केवळ महिलांच नाही तर लहान मुलींचा सहभाग होता. लहान मुलींनी स्वागत गीते गायली.

महिलांनी वस्ती पातळीवरील जमिनीचे मुद्दे, घरकुल, शौचायलची सुविधा व महिलांवरील हिंसा याबाबत मुद्दे मांडले. माझ्या मांडणीची सुरुवात ही मी महिलांना प्रश्न विचारून केली. मी महिलांना विचारले की महिला दिन म्हणजे काय? काही महिला म्हटल्या की माहिती नाही त्यानंतर एक महिला उभी राहिली व म्हणाली बाईचा दिवस म्हणजे महिला दिन.

अनेक वर्षांपासून आपण जागतिक महिला दिन साजरा करतो पण अदयाप पाला, तांड्या व भटक्यांच्या वस्ती पर्यंत जागतिक महिला दिनाचे महत्व पोहचले नाही. अनेकांनी याबाबत आपली भूमिका मांडली त्यामध्ये 2021 च्या जनगणनेत भटक्या विमुक्तांच्या समावेश, भटक्या विमुक्त महिलांना जातीचे दाखले मिळाले पाहिजे, जातपंचायत बंद झाली पाहिजे, भटके विमुक्त जमातींना घरे मिळाली पाहिजे व शेवटचा CAA, NRC बाबत एकजुटीने आवाज उठवला पाहिजे. शेवटी सर्वांनी एकमेकींना महिला दिनाच्या शुभेच्छा दिला. जाता जाता वरील मुद्यावर संघर्ष करण्यासाठीची उमेद घेऊन गेल्या.

Updated : 9 March 2020 6:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top