हळदीकुंकूच्या पलीकडे.... महिला दिन साजरा
X
महिला दिनानिमित्त खूप कार्यक्रम होत असतात. कुठे हळदीकुंकू, पाककृती स्पर्धा होतात तर कुठे स्त्रियांसाठी व्याख्याने होतात. मात्र या सगळ्यापेक्षा महिलांसाठी वेगळं काय करता येईल तसेच स्त्रियांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा म्हणून खगोलशास्त्राचा कार्यक्रम डॉ. साधना पवार यांनी आयोजित केला होता.
खगोलशास्त्रज्ञ कृष्णा गायकवाड ह्यांच्या वंडर्स ऑफ युनिव्हर्स ह्या संस्थेच्या मदतीने, खगोलविज्ञानाविषयी आधी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन दाखवून मोठ्या शक्तिशाली दुर्बिणीतून चंद्र, गुरू आणि त्याचे उपग्रह, शनी आणि त्याची कडी दाखवण्यात आली. यावेळी स्त्रियांचे आणि त्यांच्या मुलांच्या शंकेचं निरासन करण्यात आले.
तसेच कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नाममात्र शुल्क 200 रु आणि 12 वर्षाखालील मुलांना 100 रु असे ठेवण्यात आले होते. यातून जमा होणारी रक्कम सामाजिक कार्यकर्ते सचिन आशा सुभाष यांच्या मासिक पाळीविषयी जनजागरण आणि गरीब स्त्रियांसाठी स्वस्तात पॅड बनवून देणाऱ्या आणि ते बनवण्याचे प्रात्यक्षिक देणाऱ्या समाजबंध या सामाजिक संस्थेस देण्यात आली. महिला दिनाचे ठिक-ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम होत असताना असा आगळा-वेगळा कार्यक्रम पुण्यात करण्यात आला.