तर समाजात महिलांना स्थान उरणार नाही – जया प्रदा
X
2019 च्या लोकसभा निवडणुकांचा हंगाम सुरु आहे. त्यातच पुरुष नेते मंडळीकडून महिला उमेदवारांवर टीका करणे हे काही नवीन नाही. निवडणुकांच्या काळात महिलांवर निशाणा साधण्यासाठी त्यांच्या चारित्र्यावर टिका-टिप्पणी करण्यात येते.
नुकतेच आझम खान यांनी माझ्याबद्दल केलेले आक्षेपार्ह वक्तव्य माझ्यासाठी अजिबात नवीन नाही. तुम्हाला आठवत असेल तर २००९ साली मी समाजवादी पार्टीची उमेदवार होते. त्यावेळी सुद्धा त्यांनी माझ्या विरोधात वक्तव्य केल्यानंतर कोणी मला पाठिंबा दिला नव्हता. मी एक महिला आहे. मी त्यांच काय केलं आहे ते मला समजत नाही. जे ते सतत माझ्याबद्दल अशा पद्धतीने बोलत असतात असे जया प्रदा म्हणाल्या.
आझम खान यांना निवडणूक लढवण्याची परवानगी देऊ नये. कारण हा माणूस निवडणूक जिंकला तर लोकशाहीचे काय होईल? समाजामध्ये महिलांना स्थान उरणार नाही. आम्ही कोठे जायचे? मी मेल्यानंतर तुम्हाला समाधान मिळणार का? तुम्हाला काय वाटते मी घाबरुन रामपूर सोडून निघून जाईन ? मी रामपूर सोडणार नाही असे जया प्रदा यांनी ठणकावून सांगितले.
आझम खान यांनी जया प्रदा यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल झाला असून महिला आयोगानेही त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले आहे. जया प्रदा रामपूरमधून आझम खान यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. आझम खान यांनी भाषण करताना मर्यादा सोडून अत्यंत खालच्या पातळीची भाषा वापरली होता.