Home > रिपोर्ट > महापालिकेच्या सभागृहात नारीशक्ती होणार बळकट

महापालिकेच्या सभागृहात नारीशक्ती होणार बळकट

महापालिकेच्या सभागृहात नारीशक्ती होणार बळकट
X

राज्यातील महापौरपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर आणि नाशिकसाठी महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी राखीव घोषित करण्यात आल्या आहेत. या राखीव जागांवर शहरातील महापौरपदाकडे अनेक इच्छुकांच्या नजरा वळल्या आहेत. त्यामुळे महापौरपदाची माळ आपल्याच गळ्यात पडावी म्हणून नगरसेवकांकडून आतापासूनच हालचाली सुरू होणार आहेत.

मुंबई महापालिकेच्या महापौरपदाची जागा खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव करण्यात आली. त्यामुळे २०१० नंतर आता पुन्हा नवी मुंबई शहराची धुरा महिला महापौर सांभाळणार आहेत.

सध्या महापालिकेच्या १११ प्रभागांपैकी ५६ जागांवर महीला नगरसेवक पदावर आहेत. पुरुषांच्या तुलनेत महिलांची ताकद जास्त असतानाही या महापालिकेच्या सभागृहात अनेकदा महिला सदस्यांना बोलताना तोंड आवरते घ्यावे लागत होते. मात्र, आता कारभार चालवणारी महिला महापौरपदावर विराजमान होणार असल्याने महापालिकेच्या सभागृहात नारीशक्ती अधिक बळकट झालेली पाहायला मिळणार आहे.

Updated : 14 Nov 2019 12:37 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top