‘या’ देशात मिळतो महिलांना १५ मिनिटात पासपोर्ट
Max Woman | 8 Sept 2019 8:19 PM IST
X
X
आपल्या देशात आधार कार्ड काढायला तालुक्याच्या गावात वारंवार चकऱा माराव्या लागल्याचं तुम्ही ऐकलेच असेल. मात्र, सौदी अरेबीयात महिलांना पासपोर्ट मिळवणं सोप्पं झालं आहे. महिलेनं पासपोर्ट मिळवण्यासाठी अर्ज केल्या नंतर अवघ्या १५ मिनिटात महिलांच्या पासपोर्टची प्रक्रिया पूर्ण होऊन त्यांच्या हातात पासपोर्ट मिळत आहे. मक्का प्रदेशातील पासपोर्टचे संचालक अबेद अल-हार्दी यांनी सौदीच्या वृत्तपत्रात सांगितले की, ‘दिवसें दिवस पासपोर्टचा अर्ज करणाऱ्यांची संख्या वाढत आहेत. आणि य़ातुनच महीलांचा उत्साह देखील दिसून येतोय’.
या पुर्वी फक्त २१ वर्षे पूर्ण असलेल्या पुरूषांना पासपोर्ट मिळायचा आणि स्त्रियांना संरक्षक म्हणून पती, वडील किंवा भाऊ यांना सोबत घेवून जावे लागायचे किंवा पासपोर्ट मिळवण्याची परवानगी आपल्या संरक्षकाकडून घ्यावी लागायची. पण आता सर्व पासपोर्ट केंद्रातून कोणत्याही निर्बंधाशिवाय २१ वर्षावरील सर्व लोकांना पासपोर्ट मिळणं शक्य झालं आहे. तसंच महिलांना २१ वर्षे पूर्ण असण्याची वयोमर्यादा देखील नाही. सौदी अरेबीयाने या महीन्यात महिलांवरील प्रवासासंबधित निर्बंध हटवले आहेत.
याआधी पासपोर्ट शिवाय महिलांना प्रवास करायचा असल्यास त्यांच्या सोबत असलेल्या पुरूषांच्या पासपोर्टवर एक पान दिले जायचे. त्यामुळे त्यांना त्याच्या संरक्षकाशिवाय प्रवास करणे अशक्य होते. परंतू आता बदललेल्या नियमांमुळे सौदीतील महिला स्वतंत्रपणे प्रवास करू शकतात.
Updated : 8 Sept 2019 8:19 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire