Home > रिपोर्ट > पुणे फलाटावरील आगळीवेगळी प्रसूती

पुणे फलाटावरील आगळीवेगळी प्रसूती

पुणे फलाटावरील आगळीवेगळी प्रसूती
X

प्रसुतीदरम्यान महिलांची विशेष काळजी घेतली जाते. परंतू पुण्यातील रेल्वे स्थानकावर घडलेला हा प्रकार सर्वांच्याच काळजाचा ठोक चुकवणारा ठरला.पुणे रेल्वे स्थानकावरील फलाटावर एका महिलेची प्रसुती झाली. तिला तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यात आली.

३५ वर्षाच्या सोनाली दत्ता केंद्रे या नऊ महिन्यांच्या गर्भवती महिला पुणे रेल्वे स्थानकावर फलाट क्र. ३ वर उभ्या होत्या. त्यावेळी त्यांच्या साडीवर होणारा रक्तस्राव एका मुलाच्या निदर्शनास आला. त्या मुलाने ताबडतोब वैद्यकीय नीगा केंद्राच्या दिशेने धाव घेतली. त्यानंतर तेथील आर पी एफ कर्मचाऱ्यांनी आदित्य बिर्लाच्या मोफत वैद्यकीय निगा केंद्रात या प्रकारबाबत फोनवर कळवले. त्यानंतर लागलीच रेल्वे कर्मचा-यांसोबत डॉक्टर माया रोकडे आणि परिचारिका सरिता माने यांनी फलाट गाठले. त्यांनी प्रसूती प्रक्रियेला तातडीने सुरुवात केली आणि सर्वसामान्य पद्धतीने प्रसूती पार पाडली.

Updated : 2 Nov 2019 9:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top