Home > रिपोर्ट > डोंबिवलीत पत्नीने जीन्स-टीशर्ट घातल्याने जीवे मारण्याचा प्रयत्न

डोंबिवलीत पत्नीने जीन्स-टीशर्ट घातल्याने जीवे मारण्याचा प्रयत्न

डोंबिवलीत पत्नीने जीन्स-टीशर्ट घातल्याने जीवे मारण्याचा प्रयत्न
X

सामाजात स्त्रियांना सामान हक्क मिळावा म्हणून कांगावा केला जातो. मात्र वस्तुस्तिथी पाहता अजूनही या हक्कापासून स्त्रिया दूर आहेत असंच चित्र समाजात आहे. स्त्रियांचे कपडे हा विषय चर्चेचा झाला आहे. मग ते माध्यम असो की सामाजिक वैचारिक वर्तुळातून बाहेर न पडलेली लोकं,. आज मुंबईमध्ये देखील अश्या घटनांना वाव नसावी मात्र अश्या घटना घडतात. महिलांवर अनेक निर्बंध घातले जातात. पत्नी जीन्स आणि टी-शर्ट घातले म्हणून पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. सुधीर सीताराम जाधव (वय 33) आणि पत्नी सुजाता हे दोघेही नोकरी करतात.

मात्र सुजाताने जीन्स आणि टी-शर्ट घालून कामाला जाणं सुधीरला पसंत नव्हते. घरातील कमावरूनदेखील यांच्यामध्ये वाद व्हायचे. सुजाता मंगळवारी कामावरून घरी आल्यावर कपड्यावरून पुन्हा त्यांच्यात वाद झाला. सुधीरने सुजाताला मारहाण करत तिचा गळा दाबला. सुजाता बेशुद्ध पडल्याचं समजता सुधीर स्वतःच रामनगर पोलिस ठाण्यात हजर झाला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहिलं तर सुजाता जिवंत असल्याचं समजताच तिला तत्काळ मुंबई सायन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. दरम्यान याप्रकरणी सुधीर सीताराम जाधव याला हत्येच्या प्रयत्नात अटक केली आहे.

Updated : 13 Dec 2019 6:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top