पुण्यात होणार महिला फोटोग्राफरच कौतुक
X
प्रत्येक क्षेत्रात आज आपले वेगळेपण ठसठशीत दिसावे म्हणून चढाओढ असणारच पण ती चव वाढवणाऱ्या मिठासारखी असावी लागते. कुठलीही कला लोकांपर्यंत पोचवण्याचं काम करत असते ते आपले काम आणि त्याची प्रसिद्धी. फोटो हे एक असे प्रभावी माध्यम आहे कि त्याचा उपयोग जाहीरातीत करावा लागणे हे क्रमप्राप्तच आहे. कलात्मक फोटोग्राफी करण्याची मानसिकता वाढली तरच या क्षेत्रात आपण ठाम पणे ऊभे राहू शकतो. या क्षेत्रातील दिग्गज लोकांनी यासाठी मार्गदर्शन करावे आणि या क्षेत्रात येण्याची उत्सुकता असणाऱ्या महिलांना याचे महत्त्व समजावे याकरिता विविध चर्चासत्राचे आयोजन दर महिन्यातून एकदा केले जाते. अलिकडेच प्रसिद्ध फूड फोटोग्राफर आशियातील एकमेव फूड डिझायनर आणि फोटोग्राफर सबा गाझियानी यांनी फूड फोटोग्राफीचा विषय फक्त महिला फोटोग्राफरना उलगडून दाखवला.
फोटोग्राफर म्हणजे तो कोणीतरी पुरूषच असणार हे गृहीत धरून आतापर्यंत अनेक सण, समारंभ शूट होत होते. परंतु डिजीटल युगात क्रांतीकारक प्रगती महिला करत आहेत. कला व तांत्रिक कौशल्य व शिक्षणाच्या आधारे या पुरूषांच्या क्षेत्रात मुसंडी मारली आहे.
लवकरच विलेपार्ले मुंबई आणि पुणे येथे शाखा सुरू होत आहे. येत्या शनिवारी आणि रविवारी फक्त महिलांसाठी वर्ग घेण्यात येत आहे. महिलांच्या या धडाडीला बघून पुण्यात पुण्यभुषण सुधीरजी गाडगीळ अर्चना ताईंच्या या ऊपक्रमाचे कौतुक करण्यासाठी आणि आशिर्वाद देण्यासाठी उपस्थित रहाणार आहेत. या महिला फोटो आघाडीला आपले मत मिळायलाच हवे आणि या फोटोग्राफीच्या क्षेत्रात महिलांनी आपली कला जगापुढे आणली पाहिजे यासाठी विशेष महिला फोटोग्राफर पारितोषीक अपॅकने जाहीर केलेले आहे.
-अर्चना देशपांडे जोशी
apacinstitute@gmail.com