Home > रिपोर्ट > कुटुंबाशिवायही महिलांना हज करता येणार

कुटुंबाशिवायही महिलांना हज करता येणार

कुटुंबाशिवायही महिलांना हज करता येणार
X

महिलांना हजयात्रेला जायचे असल्यास कुटुंबाशिवाय जाता येत नव्हते. परंतु आता कुटुंबाशिवायही महिला हजयात्रा करू शकणार आहेत, अशी माहिती राज्य हज समितीचे अध्यक्ष जमाल सिद्दिकी यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली.

यावेळी १४,९९५ हजयात्री राज्यातून जाणार असून, यात नागपूरच्या ६४४ हजयात्रींपैकी १३१ महिला आहेत. राज्यात सर्वसाधारण गटातून ३५,९६६ अर्ज आले होते. या अर्जांतून सोडत काढल्यानंतर ३३ हजार साधारण अर्ज निवडण्यात आले. यातील २,२८४ अर्ज मंजूर करण्यात आले. यात महाराष्ट्राचा कोटा १४,९९५ एवढा आहे आतापर्यंत हज यात्रेसाठी कुटुंबातील सदस्यच जाऊ शकत होते. यातही रक्ताचे नाते असलेल्या यात्रेकरूंचा समावेश असायचा. यावेळी हज समितीच्या विनंतीनुसार, कुटुंबाशिवाय चार महिलांचा गट बनवून हजयात्रा करता येणे शक्य आहे.

आता जिल्हानिहाय हज समिती तयार झाल्याने तेथेच हज यात्रेकरूंची माहिती ऑनलाइन तयार करून त्यांना हजयात्रेच्या दिवशी थेट विमानतळावर पोहोचण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यावेळी हज समिती सदस्य स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने हजयात्रेकरूंना मदत करतील. निजामाने त्या काळात सौदी अरेबियात हज यात्रेकरूंसाठी इमारत उभारून निवासाची सोय केली. आजही हैदराबाद आणि औरंगाबाद येथील हज यात्रेकरूंची तेथे मोफत निवास व्यवस्था होते. याला 'रूबाब कॅटेगरी' असे म्हणतात.

Updated : 9 May 2019 9:54 AM GMT
Next Story
Share it
Top