Home > रिपोर्ट > २१ वर्षीय महिलेने मुलाच्या जन्मानंतर रूग्णालयातच दिली परीक्षा

२१ वर्षीय महिलेने मुलाच्या जन्मानंतर रूग्णालयातच दिली परीक्षा

२१ वर्षीय महिलेने मुलाच्या जन्मानंतर रूग्णालयातच दिली परीक्षा
X

इथोपियामध्ये अल्माज डेरेसी या २१ वर्षीय महिलेने बाळाला जन्म दिल्याच्या अर्धा तासानंतर लगेचच रूग्णालयातच सेकंडरी स्कूलची परीक्षा दिली. परीक्षेच्या आधी काही दिवस आपल्या बाळाचा जन्म होईल असे तिला वाटले होते. पण काही कारणामुळे परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात आली. तिची डिलीव्हरी आणि परीक्षा एकाच दिवशी आल्याने बाळाला जन्म दिल्यानंतर अल्माजने परीक्षा दिली.

नव्या वेळापत्रकानुसार ११ जूनपासून परीक्षेला सुरूवात झाली. याच दरम्यान तिच्या डिलीव्हरीची तारीख होती. मंगळवारी पहिला पेपर सुरू होण्याआधीच तिला लेबर रूममध्ये जावे लागले. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. डिलीव्हरीच्या अर्धा तासानंतर तिने रूग्णालयातच इंग्रजीचा पेपर दिला. पुढील गणित आणि मातृभाषेची परीक्षाही तिला रूग्णालयातच द्यावी लागणार आहे. त्यानंतरचे पेपर ती परीक्षाकेंद्रावर देणार आहे.

कोणत्याही परिस्थितीत परीक्षा द्यायचीच होती!

गर्भावस्थेत असतानाही मी खूप अभ्यास केला. मला वर्ष वाया घालवायचे नव्हते. अल्माजच्या पतीने तिला रुग्णालयात परीक्षा देण्याची परवानगी मिळण्यासाठी शाळेत पाठपुरावा केला. अल्माजने आतापर्यंतचे शिक्षण मोठ्या कठीण परिस्थितीत पूर्ण केले आहे.

Updated : 12 Jun 2019 11:47 AM GMT
Next Story
Share it
Top