Home > रिपोर्ट > पंकजा मुंडेंसाठी ‘हा’ नेता देणार आमदारकीचा राजीनामा?

पंकजा मुंडेंसाठी ‘हा’ नेता देणार आमदारकीचा राजीनामा?

पंकजा मुंडेंसाठी ‘हा’ नेता देणार आमदारकीचा राजीनामा?
X

विधानसभा निवडणूकीतील परळी मतदारसंघातील लढत सर्वात लक्षवेधी ठरली. एकिकडे बहीण पंकजा मुंडे तर दुसरीकडे भाऊ धनंजय मुंडे अशी चुरशीची लढत पाहायला मिळाली. या लढाईत धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांनी पंकजा मुंडे (Pankaja munde) यांचा दारुण पराभव केला. त्यामुळे पंकजा मुंडेंच्या समर्थकांना धक्का बसला.

पंकजा मुंडे यांच्या या पराभावामुळे आमदार रत्नाकर गुट्टे हे अत्यंत दुःखी झाले होते. पंकजा मुंडे निवडून यायला हव्या होत्या असे म्हणताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. एवढंच नाही तर, पंकजा मुंडे यांच्यासाठी त्यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची देखील तयारी दाखवली आहे. तसेच पंकजा मुंडे यांना गंगापूर विधानसभा मतदारसंघातून लढण्याची विनंती गुट्टे यांनी केली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष राजेभाऊ श्रीराम फड यांनी प्रसिद्धीपत्रक काढत याची माहिती दिली आहे.

Updated : 27 Oct 2019 10:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top