Home > रिपोर्ट > बेलापूरमध्ये आमदार मंदा म्हात्रे लढणार का? मुख्यमंत्री म्हणतात...

बेलापूरमध्ये आमदार मंदा म्हात्रे लढणार का? मुख्यमंत्री म्हणतात...

बेलापूरमध्ये आमदार मंदा म्हात्रे लढणार का? मुख्यमंत्री म्हणतात...
X

मुख्यमंत्र्यांनी स्वत: नवी मुंबई बेलापूर मतदारसंघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांची नाराजी दूर केली आहे. शिवसेना भाजपाची युती आणि जागावाटपांवर अजून काही निर्णय झालेला नसताना भाजपाच्या जागेवर शिवसेनेचा डोळा असल्याचं, युवानेते आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यावरून अप्रत्यक्षपणे दिसून येत होतं. त्यामुळे नवी मुंबई बेलापूर मतदारसंघातून शिवसेना निवडणूक लढवणार असल्याची चिन्हं दिसून येत आहेत.

तर दुसरीकडे राष्ट्रवादीतून भाजपामध्ये प्रवेश केलेले जेष्ठ नेते गणेश नाईक हे देखील बेलापूर मतदारसंघातून इच्छूक असल्याचं समजतंय. त्यामुळे मंदा म्हात्रे निवडणूक लढवणार का या संदर्भात चर्चेला उधान आले होते. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणूकीमध्ये मंदा म्हात्रे यांच्यासमोर मोठे आव्हान उभं राहीलं आहे.

परंतू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंदा म्हात्रे यांचे स्थान अबाधित राहील असा विश्वास दिल्यानं त्यांची नाराजी दूर झाली आहे.

Updated : 18 Sept 2019 6:41 PM IST
Next Story
Share it
Top