Home > रिपोर्ट > महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळेल का?

महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळेल का?

महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळेल का?
X

राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा अद्यापपर्यंत सुटलेला नाही. त्यातच राज्यात सत्ता स्थापनेच्या केंद्रस्थानी असलेले शरद पवार सध्या नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी शरद पवार यांनी काल केली. त्यानंतर आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील शेतीच्या प्रश्नासह राजकीय घडामोडींबाबत माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी पत्रकारांनी शरद पवार यांना राज्यात महिला मुख्यमंत्री होणार का? या संदर्भात प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की, “महिला मुख्यमंत्री झाली तर आम्हाला आनंद होईल. पण तशी मागणी हवी बहूमत हवं, पण सध्या परिस्थिती नसल्यानं मी या बाबत विचार केला नाही.” असं पवारांनी म्हटल आहे.

असं म्हटलं आहे. शरद पवार यांनी अगोदर राज्यात आणि नंतर देशात महिला धोरण राबवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यातच सध्या शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉग्रेस यांच्यामध्ये सत्तेच्या वाटपा संदर्भात बैठकी सुरु आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेला अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्री पद मिळू शकते. त्यामुळं यावेळेला शरद पवार मुख्यमंत्री पदाच्या खुर्ची वर बसवून महाराष्ट्रात महिलेला बसवणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. तेव्हापासून आत्तापर्यंत पुरोगामी म्हटल्या जाणाऱ्य़ा महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री झालेली नाही.

Updated : 15 Nov 2019 4:00 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top